दि. ३१, महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष बाबाजी शेलार यांची मुंबई येथे भेट घेऊन ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च सन्मान “दादासाहेब फाळके” पुरस्कार आणि तमाशा सम्राट रघुवीर खेडकर यांना “पद्मश्री” पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, यासाठी भाजपा युवा मोर्चा पुणे जिल्हा सरचिटणीस अमित सोनवणे आणि भाजपा सांस्कृतिक आघाडीचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष योगिराज शिंदे यांनी लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
आशिष शेलार यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान सोनवणे व शिंदे यांनी मराठी अभिनेते अशोक सराफ व रघुवीर खेडकर यांच्या कले विषयी व कारकिर्दीचा विशेष उल्लेख करत सादर केलेल्या पत्रात या दोन्ही कलाकारांच्या कार्याचा आढावा घेत अशोक सराफ यांना “दादासाहेब फाळके” आणि रघुवीर खेडकर यांना “पद्मश्री” पुरस्काराने सन्मानित करण्याची विनंती केली.
अशोक सराफ यांनी मराठी तसेच हिंदी चित्रपट सृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे, त्यांची विनोदी भूमिका आणि संवेदनशील अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकले आहे तसेच रघुवीर खेडकर यांनी लोकनाट्य तमाशा या लोककलेला नवे आयाम देऊन ती नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य असून मराठी कला आणि संस्कृतीचा गौरव करणे तसेच कलाकारांना योग्य तो सन्मान मिळवून देणे या मागणीचा उद्देश असल्याचे योगीराज शिंदे यांनी सांगितले आहे.
मागणीचे पत्र स्वीकारताना या विषयावर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले व अशोक सराफ आणि रघुवीर खेडकर यांच्या कार्याबद्दल कौतुक व्यक्त केले व ही मागणी योग्य मंचावर मांडली जाईल अशी ग्वाही सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी दिली असल्याचे अमीत सोनवणे यांनी सांगितले.