मुंबई येथे अधिवेशना दरम्यान महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भाजप युवा मोर्चा पुणे जिल्ह्या सरचिटणीस अमित तानाजी सोनवणे व भाजप सांस्कृतिक आघाडी पुणे यांचे उपाध्यक्ष योगीराज शिंदे यांनी भेट घेऊन शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघातील विविध मागण्यांसाठी लेखी निवेदन दिले.
यावेळी शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघातील वाघोली ते शिरूर दरम्यान प्रस्तावित उन्नत बहुमजली उड्डाणपुलाचे काम लवकर सुरू करावे, तसेच या महामार्गाला धर्मवीर छत्रपती श्रीसंभाजी महाराज यांचे नाव देण्याची मागणी केली. हा महामार्ग संभाजी महाराजांच्या बलिदान भूमीतून जात असल्याने त्याला ‘धर्मवीर संभाजी राजे उड्डाणपूल’ असे नाव देण्यात यावे, असे सुचविण्यात आल्याचे अमित सोनवणे यांनी सांगितले .
छत्रपती संभाजी महाराज हे श्रीराम प्रभूंनंतर एकमेव राजे होते, ज्यांनी जंजिरा समुद्र युद्धात दगडी सेतू उभारून सिद्धी जोहरला पराभूत केले. त्यामुळे राज्यातील या बहुचर्चित तीन मजली उड्डाणपुलाला त्यांचे नाव देणे ही काळाची गरज आहे.” या मागणीसह त्यांनी उड्डाणपुलाच्या कामाला गती देण्याची विनंतीही उपमुख्यमंत्र्यांना केली, दरम्यान, तीर्थ क्षेत्र तुळापूर, वढू बुद्रुक येथील बलिदान कार्यक्रमाला उपस्थित राहणार असून, छत्रपती संभाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडी) हद्दीतील वाढत्या बेकायदेशीर बांधकामांवरही चिंता व्यक्त केली. पीएमआरडी हद्दीत बेकायदेशीर बांधकामांमुळे बकाल वस्ती वाढल्या असून, नागरीकरणाच्या समस्या गंभीर बनल्या आहेत.तसेच बेकायदेशीर बांधकामांमुळे परिसरातील नियोजन कोलमडले असून, यावर तातडीने उपाययोजना करण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले, याला पीएमआरडीचे अधिकारीही जबाबदार आहेत, बेजबाबदार अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी यावेळी अमित सोनवणे यांनी केली आहे, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी या मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे, राज्यातील विकास व ऐतिहासिक वारसा असलेल्या स्वराज्य रक्षक “शंभुराजे” यांचा इतिहास जपणुकीच्या दृष्टीने ही भेट व महत्त्वपूर्ण ठरली आहे.