|
बस चालवताना मोबाईल वापर आणि तंबाखू सेवन केल्यास होणार कारवाई..

Table of contents
- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) च्या एका चालकाला बस चालवताना आयपीएल सामना पाहिल्यामुळे निलंबित करण्यात आले. या घटनेनंतर, PMPML ने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना कडक सुचना जारी केल्या आहेत.
- एखादा चालक मोबाईल वापरताना किंवा तंबाखू खाताना आढळल्यास त्याला निलंबित केलं जाऊ शकतं. याबाबतचे निर्देश पीएमपीएमएलने कर्मचाऱ्यांना दिले आहेत.
- पीएमपीएमएलने चालक किंवा वाहकांविषयीच्या तक्रारींसाठी व्हाट्सअॅप क्रमांक देखील जारी केला आहे. त्यानुसार प्रवाशांना ता तक्रारींचे फोटो किंवा व्हिडिओ तसंच ज्या बसची तक्रार करायची आहे त्या बसचा क्रमांक पीएमपीएमएलच्या ‘complaints@pmpml.org’ या ईमेलवर पाठवता येणार आहे. तसंच 9881495589 या व्हाट्सअॅप क्रमांकावर देखील तक्रार पाठवण्याची विनंती पीएमपीएमएल प्रशासनाकडून करण्यात आली आहे.
विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)