धर्मवीर श्रीसंभाजी महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी व्हा;- प्रदीप कंद 

 शंभूराजांच्या शौर्याची आणि विज्ञानवादी दृष्टिकोनाची नव्या पिढीला ओळख व्हावी या हेतूने हा पालखी सोहळा;- संस्थापक पै.संदिप भोंडवे 

लोणीकंद: स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर श्री संभाजी महाराज यांच्या ३३५ व्या पुण्यतिथी निमित्त बुधवार (दि.२६) ते शनिवार (दि.२९) या ४ दिवसांच्या कालावधीत संभाजी राजे जन्मस्थळ किल्ले पुरंदर ते बलिदान,समाधीस्थळ श्रीक्षेत्र तुळापूर व वढू बुद्रुक या दरम्यान पालखी सोहळ्याचे प्रस्थान होणार आहे तरी महाराजांची शौर्यगाथेला मानवंदना करून नतमस्तक होण्यासाठी मोठ्या संख्येने शंभू भक्तांनी सहभागी व्हावे यासाठी पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा पिडीसीसी बँकेचे संचालक प्रदीप विद्याधर कंद यांनी आवाहन केले आहे.

संस्थापक पै.संदिप भोंडवे यांच्या नियोजनाने गेल्या अकरा वर्षांपासून छत्रपती संभाजी महाराजांचा पालखी सोहळ्याचे आयोजन केले जात आहे,या सोहळ्यात चांदीचा रथ,अश्व,स्वराज्यातील सरदार घराणी व भजनी मंडळांचा समावेश असणार आहे. या वर्षीच्या पालखी सोहळ्याच्या रथाच्या बैलजोडीचा मान पेरणे येथील किरण कोलते यांना देण्यात आला असून, अश्वाचा मान हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज विलासराव मोहिते यांना मिळाला आहे.

पालखी सोहळ्याच्या वेळापत्रकानुसार बुधवारी (दि.२६) सकाळी ८.३० वाजता किल्ले पुरंदर येथे अभिषेक,महापूजा व आरती करून पालखीचे प्रस्थान होईल.त्यानंतर नारायणपूर येथून सासवडकडे प्रस्थान,सायंकाळी काळेवाडी येथे मुक्काम.गुरुवारी (दि.२७) सकाळी प्रस्थान, दुपारी उरुळी फाट्यावर विसावा मुक्कामानंतर लोणीकाळभोर येथून शुक्रवारी (दि.२८) सकाळी प्रस्थान श्रीक्षेत्र थेऊर येथे दुपारी विसावा सायंकाळी लोणीकंद येथे मुक्काम, शनिवारी (दि.२९) सकाळी लोणीकंद येथून प्रस्थान व पुलगाव येथे अल्पोपहारानंतर श्रीक्षेत्र तुळापुरात पादुका पूजन,आरती,शासकीय मानवंदना, पुष्पवृष्टी व त्यानंतर वढू बुद्रुक येथे आरती नंतर सोहळ्याचा समारोप होणार आहे.

छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या पराक्रमाचे युवकांना नव्याने स्मरण करणे,त्यांची खरी प्रतिमा जगासमोर आणणे,त्यांच्या शौर्याची आणि विज्ञानवादी दृष्टिकोनाची नव्या पिढीला ओळख व्हावी या हेतूने हा पालखी सोहळा आयोजित करण्यात येत:- संस्थापक पै.संदिप भोंडवे

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें