उंड्री चौकात रस्ता रोको आंदोलना प्रसंगी मराठा बांधव (छाया:संदिप डोके हडपसर)
हडपसर प्रतिनिधी संदिप डोके
जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसलेल्या आंदोलकांवर करण्यात आलेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ उंड्री गाव संघर्ष समिती व मराठा समाजाच्यावतिने रस्ता रोको आंदोलन करण्यात आला त्यामुळे परिसरात वहातुक कोंडी मोठ्या प्रमाणात झाली होती मराठा समाजाला सरकारने लवकरात लवकर आरक्षण देण्याची मागणी या वेळी आंदोलकांनी केली.
यावेळी जनसेवक राजेंद्र भिंताडे म्हणाले की मराठा समाजाल आरक्षण देण्याची मानसिकता दिसत नाही प्रत्येक वेळेस मराठा समाजाला वेठीस धरत आहे आंदोलना पायी अनेक तरुणांना आपला जीव गमवावा लागला तरी सरकारला जाग येत नाही मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यास २५ ते ३० हजार मराठा बांधवांच्या उपस्थित आंदोलन करण्याचा इशारा भिंताडे यांनी दिला. कोणताही अनुसुचित प्रकार घडु नये म्हनुन कोंढवा पोलिस ठाण्याच्या वतिने आंदोलनस्थळी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता
यावेळी आंदोलनात निवृत्ती बांदल,जनसेवक राजेंद्र भिंताडे,संजय जाधव,सुभाष टकले,शशिकांत पुणेकर,वसंत कड,अनिल कानडे,कुंडलिक पुणेकर,उत्तम फुलावरे,गणेश कानडे,मोहन भाडळे,सोमनाथ आंबेकर,महेंद्र जाधव,सत्यवान पुणेकर,देवीदास बांदल यांच्यासह मराठा समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते अशी माहिती जनसेवक राजेंद्र भिंताडे यांनी “शिरूर हवेली न्यूज” ला दिली.