बाभुळसर बु प्रतिनिधी. .
शिरूर तालुक्यातील बाभुळसर बु येथे दि. ६/९/२०२३ रोजी आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांच्या ज्योतीचे ग्रामपंचायत कार्यालयासमोर जोरदार स्वागत ग्रामस्थांनी केले. यावेळी उपस्थित गावचे सरपंच दिपालीताई नागवडे, परिक्रमा शिक्षण संस्था संचालक हनुमंत पाटोळे, ज्येष्ठ संचालक बबन मामा टेकवडे,उपसरपंच सुनील देशवंत,श्रीराम विविध सहकारी संस्था चेअरमन किशोर नागवडे,मंगल भंडलकर सदस्य ग्रा पं,किरण राऊत यांनी प्रतिमेला पुष्पहार घालून पुजा केली.
यावेळी सरपंच दिपालीताई नागवडे यांनी क्रांतीवीर उमाजी नाईक यांच्या जीवनावर आधारित मनोगत व्यक्त केले.याप्रसंगी कुसूम भंडलकर, नंदा भंडलकर, आश्विनी भंडलकर, गंगाबाई चव्हाण, प्रगतशील शेतकरी संतोष टेकवडे,जि प शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष महेंद्र नागवडे,शिवभक्त लक्ष्मण टेकवडे कैलास कांबळे संचालक श्री दत्त ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्था,अमित नागवडे संगणक परिचारक ग्रामपंचायत,उदयोजकअजित पाटोळे, रमेश आडके, दादासाहेब भंडलकर,सिध्दार्थ रणदिवे,लालासो नागवडे,संतोष भंडलकर, शामराव चव्हाण,शहाजी शिरोळे, जयेश फासगे,दत्ता भंडलकर,सागर भंडलकर,गणेश खोमणे, शुभम भंडलकर, भाऊ भंडलकर, रोहिदास शिरोळे, दत्ता चव्हाण, सुनील भंडलकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी संध्याकाळी भव्य मिरवणूक काढण्यात आल्याची माहिती महेंद्र नागवडे यांनी “शिरूर हवेली न्यूज” ला दिली.