शिरूर तालुक्यातील गुनाट बनले तीर्थक्षेत्र! दत्त जन्म सोहळ्यासाठी हजारो भाविकांची गर्दी
शिरूर प्रतिनिधी : एकनाथ थोरात
शिरूर तालुक्यामधील पुर्व भागातील तीर्थक्षेत्र श्री.दत्त पंढरी म्हणून ओळखले जाणारे गुनाट येथे गेली ३१ वर्षे पासुन अंखड हरिनाम सप्ताह दत्त जयंती निमित्ताने पार पडत आहे. या वर्षी ३२ व्या वर्षात पदार्पण करीत असून त्याचा प्रारंभ विनापुजन करून झाला.
सप्ताह कालावधीत वीणाप्रहार, नियमित हरिपाठ, काकडा भजन, कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. भाविकांना अन्नदान तसेच मंदिरावर आणि परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तर मंडपही उभारण्यात आला आहे. दि १४ वार शनिवार रोजी गावातून दिंडी प्रदिक्षेने भक्तिमय वातावरणात पालखी मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी हजारोंच्या संख्येने उपस्थित भाविक भक्तांनी!! दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा !! जयघोष केला यावेळी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता
दि १५ पहाटे ४ वाजता देव जन्म होत असतो दत्तजयंती सप्ताह सांगते निमित्त हभप पुंडलिक महाराज नागवडे यांचे काल्याचे कीर्तन होणार असून महाप्रसाद आणि त्यानंतर मंदीर जीर्णोद्धार मध्ये केलेली धार्मिक मदत व त्यांचे सामाजिक व धार्मिक काम लक्षात घेऊन गुनाट ग्रामस्थांच्या वतीने व दत्त देवस्थान च्या वतीने माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीपदादा कंद यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे व रात्री ९ वाजता गोविंद महाराज गायकवाड यांचे भारूडाचा कार्यक्रम होणार आहे.
या परिसरात सर्वात जागृत देवस्थान म्हणून ख्याती आहे.दत्त जयंतीला हजारो भक्त गुनाट या गावी दर्शनाला येत असुन दत्त दर्शनाचा लाभ घेत आहे त्रिमुखी मुर्ती असुन सव्वा सहा फुट उंचीची व आखीव रेखीव देखणी दत्त मुर्ती असल्याने भाविक भक्त प्रसन्न होत आहेत.