शिवसेना “उद्धव बाळासाहेब ठाकरे” गट यांच्या वतीने वाघोली येथे श्री गणेशाची मूर्ती बनविण्याचे मोफत प्रशिक्षण

 

लोणीकंद प्रतिनिधी 

हवेली तालुक्यातील वाघोली येथे ज्ञानेश्वर कटके सोशल फाउंडेशन आयोजित ज्ञानेश्वर पंढरीनाथ कटके शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख ( उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक १०/०९/२०२३ रोजी सकाळी ९.०० वाजता वाघेश्वर मंगल कार्यालयात शाडू माती पासून श्री गणेशमूर्ती बनविण्याचे मोफत प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केले असल्याची माहिती ज्ञानेश्वर पंढरीनाथ कटके यांनी शिरूर हवेली न्यूज ला दिली.

या कार्यक्रमात भाग घेणाऱ्या मुलांना प्रथम सोबत दिलेल्या गुगल फॉर्म लिंक वर https://forms.gle/ebMZWMtGhTHuSRqa9 आपले नाव नोंदणी व्यवस्थित करायची आहे. या कार्यशाळेत लहान मुलांना शाडू माती पासून श्री गणेशाची पर्यावरण पूर्वक मूर्ती बनविण्याचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे तसेच कार्यक्रमात भाग घेणाऱ्या प्रत्येकास आमच्याकडून शाडू माती पुरवण्यात येईल.

तरी आपण आपल्या पाल्यासोबत पालकांपैकी कोणी एका व्यक्तीने उपस्थित राहावे जेणेकरून प्रशिक्षकांकडून आपल्या पाल्यास ज्या सूचना दिल्या जातील त्या त्यांना व्यवस्थितपणे समजण्यास मदत होईल. तसेच या प्रशिक्षणामध्ये या परिसरातील बहुसंख्य मुलांनी भाग घेण्याचे आवाहन आयोजक ज्ञानेश्वर पंढरीनाथ कटके यांनी केले असल्याचे “शिरूर हवेली न्यूज” शी बोलताना सांगितले.

 

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें