महायुतीच्या उमेदवारांना विजयी करा – जनता दल प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे

 

शिरूर प्रतिनिधी:एकनाथ थोरात                                       महायुतीच्या प्रचारार्थ जनता दल सेक्युलर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांनी मराठवाडा विभागाचा तीन दिवसाचा प्रचार दौरा केला.

या प्रचार दौऱ्यामध्ये जालना, बीड, हिंगोली, लातूर, छत्रपती संभाजी नगर, परभणी,नांदेड, या ठिकाणी जनता दल सेक्युलर पक्षाचे पदाधिकारी तसेच महायुती च्या पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेत बैठका,मेळावे,पत्रकार परिषदा तसेच सभा घेऊन महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन यावेळी नाथाभाऊ शेवाळे यांनी बोलताना केले,

या तीन दिवसाच्या दौऱ्यामध्ये जालना हिंगोली, लातूर,बीड,छत्रपती संभाजीनगर, परभणी या जिल्ह्यातील नेते, जनता दल सेक्युलर पदाधिकारी,महायुतीचे नेते तसेच मित्र पक्षातील नेते यांच्या भेटी घेतल्या.महायुतीच्या सरकारने यांनी महाराष्ट्रातील महिलांना लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांना वीज माफी,तसेच शिक्षित तरुणांना रोजगार, अशा मोठ्या प्रमाणात योजना राबवल्याने जनतेमध्ये या सरकार बद्दल सहानुभूती असल्याची नाथाभाऊ शेवाळे बोलताना सांगितले,

या दौर्यादारम्यान त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथे प्रधान महासचिव अजमल खान, अँड.बापूसाहेब देशमुख, परभणी जिल्हाध्यक्ष भगवान साळवी, हिंगोली जिल्हा अध्यक्ष पांडुरंग देसाई, नांदेड येथे प्रदेश सरचिटणीस किरण चिद्रवार, माधव पटणे,जेष्ठ नेते माजी आमदार गंगाधर पटणे, मुखडे ,लोहा, कंधार मेहबूब पठाण,बीड जिल्हाध्यक्ष खतीब, अक्षय मुंदडा केज मतदार संघ या पदाधिकारी व महायुतीतील घटक पक्षांच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या भेटी घेतल्या व येणाऱ्या काळात महाराष्ट्र मध्ये महायुतीचेच सरकार येणार असून महायुतीच्या उमेदवारांना विजयी करावे असे आवाहन नाथाभाऊ शेवाळे यांनी दौऱ्यादरम्यान केले.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें