ज्ञानेश्वर कटकेंसाठी भाजपचे कार्यकर्ते एकवटले..! 

ता.१०;शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघातून महायुतीकडून अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्ञानेश्वर कटके यांना उमेदवारी मिळाल्याने यांच्या निवडणूक प्रचारार्थ भाजपचे शिरूर, विधानसभा निवडणुक प्रमुख प्रदीप कंद यांच्या उपस्थितीत लोणीकंद येथे बैठक संपन्न झाली, पेरणे वाडेबोल्हाई गटातील भाजपचे कार्यकर्ते एकवटले असून  ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांना पाठींबा दर्शविला असून महायुती धर्म पाळणार असल्याचे जाहीर केले.

लोणीकंद येथील बैठकीत पेरणे वाडेबोल्हाई गटातील भाजपा पदाधिकारी व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने बैठकीस उपस्थित होते या बैठकीत संपुर्ण कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीमागे राहण्याचा निर्णय घेण्यात आला वेगाने राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत.

भारतीय जनता पार्टी महायुती सरकारच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला आहे. पुढील काळात मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साध्य करण्यासाठी महायुतीला मतदान करण्याचे तसेच महायुती धर्म पाळण्याचे आवाहन पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीपदादा कंद यांनी उपस्थित नागरिकांना केले.

 

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें