नागरगाव मध्ये माऊली कटके यांच्या प्रचार दरम्यान मतदारांचा उस्फूर्त प्रतिसाद

शिरुर तालुका प्रतिनिधी ता ८. नागरगाव तालुका शिरूर जिल्हा पुणे येथे शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघामध्ये वडगाव रासाई..मांडवगण फराटा जिल्हा परिषद गटामधील नागरगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार (अजितदादा गट) , भाजपा, शिवसेना शिंदे गट, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, रयत क्रांती महायुतीचे उमेदवार माऊली आबा कटके यांच्या प्रचारार्थ ढोल ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतिषबाजीत पै. माऊली आबा कटके यांचे बंधू हिंदकेसरी पैलवान अभिजीत कटके ,सुनील उर्फ चाचा जाधवराव ,एकनाथ शेलार, अनिल शेलार, शरद साठे , कांतिलाल आबा शेलार, पूनंभाऊ शेलार, शरद चव्हान, रमेश बापू शेलार, महेंद्र बीडगर, राजाभाऊ शेलार, सगन नारनोर, माऊली पाटोळे, सुनील साठे ,सुभाष शेलार , सचिन साठे, आदी मान्यवरांचा गावच्यावतीने स्वागत करण्यात आले.

यावेळी अभिजित कटके यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पूजा करून महाराजांना पुष्पहार अर्पण करण्यात आले आणि छत्रपतींचा शिवाजी महाराजांचा जयजयकार करत हनुमान मंदिराकडे सभास्थळी पदयात्रा आगमन झाले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र शेलार यांनी केले तसेच स्वागत. मंगेश चव्हान यांनी केले व प्रास्ताविकात बोलताना राजाभाऊ शेलार यांनी सांगितले की माऊली आबा कटके यांनी महाकाल दर्शनासाठी शिरूर हवेलीतून तब्बल ४० हजार भाविकांना उजैन दर्शन घडवून आणले .तसेच जनतेला काही द्यायचे असेल समोरच्या व्यक्तीमध्ये दानत लागते .यावेळी बोलताना हि फक्त झाकी आहे, नंतर काशी आहे असे म्हटले आहे. तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये बोलताना एकनाथ शेलार यांनी अशोक पवार यांच्यावर निशाणा साधत अशोक पवार यांनी घोडगंगा सहकारी साखर कारखाना बंद पाडून लोकांच्या चुलीमध्ये पाणी ओतण्याचे काम केले आहे. त्यामुळे जनता त्यांना कधीच माफ करणार नाही .तसेच माऊली आबांच्या माध्यमातून शिरुर हवेली ला आमदार म्हणून आळंदीचा माऊली भेटला आहे. तसेच सर्व मतदारांना आव्हान करीत माऊली आबा यांना ७५००० मताधिक्य मिळून प्रचंड मताने विजय होतील असा विश्वास व्यक्त केला .तसेच विरोधकांच्या माऊली आबा कटके कोरोनाच्या काळात कुठे गेले होते त्यास उत्तर म्हणून मांडवगण फराटा येथे कोरोना सेंटरला आर्थिक मदत केली आहे.

पूरग्रस्तांना आर्थिक मदत व संसार उपयोगी वस्तू देण्यात आले .तसेच चक्रीवादळांमध्ये शिरुर हवेली मतदारसंघांमध्ये घरावरील छते वाऱ्यामुळे उडून पडल्यामुळे गरीब कुटुंब उघड्यावर आले होते ,अशा गरीब कुटुंबांना आर्थिक एक हात मदतीचा देण्याचे काम माऊली आबा कटके यांनी दिले. तसेच कोणत्याही गोष्टीची माहिती न घेता विनाकारण दानशूर व्यक्तीचा अपमान करू नका अशा खरपूस शब्दात समाचार घेतला .तसेच सर्व नागरगाव व पंचक्रोशी परिसरातील मतदारांची अशोक पवार यांचे विषयी चिड निर्माण झाल्याचे या ठिकाणी दिसून आली.तसेच हिंदकेसरी पैलवान अभिजीत दादा कटके यांनी सर्व मतदारांना चांगल्या प्रकारे उच्चांकी मताधिक्य देण्याचे आवाहन केले, त्यांनी यापुढे बोलताना सांगितले माऊली आबा कटके आमदार नसून तुम्ही सर्व जनता आमदार होईल. तसेच सर्वसामान्यांच्या प्रश्नांना मार्गी लावण्याचे काम माऊली आबा करतील असा विश्वास व्यक्त केला सर्व उपस्थितांचे आभार भाऊसाहेब निंबाळकर यांनी मानले.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें