लोणीकंद (ता. हवेली ) ता.३ विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने समाजात चुकीचा अप्रचार होईल असे व्हॉटसअप सोशल मिडीयावर स्टिकर बनवून ते विविध समाज माध्यमांवर प्रसारित करून जनतेची दिशाभूल तसेच बदनामी केल्याप्रकणी किरण संजय झुरुंगे रा. लोणीकंद (मगर वस्ती) ता. हवेली जि. पुणे यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात लेखी तक्रार देऊन संबंधितावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
लोणीकंद येथील रहिवाशी असणारे बैलगाडा प्रेमी किरण संजय झुरुंगे यांनी दिपावलीच्या निमित्ताने नरकचतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर सोशल मिडीयावर पोस्ट केले होते परंतु अज्ञात समाजकंटकाने त्या पोस्टची स्क्रीनशॉट काढून त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते शरद पवार यांचा फोटो व त्यांचे निवडणुकीचे चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस (आमचे चिन्ह आणि पक्ष फक्त पवार साहेब / साहेब सोबतीला महाराष्ट्र आहे अक्का)असा उल्लेख केला तसेच त्याखाली मा. प्रदिपदादा कंद व किरणशेठ झुरुंगे यांचे नाव, बैलगाडा संघटना असा उल्लेख केलेली चुकीची पोस्ट बनवून बदनामीच्या उद्देशाने सोशल मीडिया वरती टाकली, संपूर्ण पुणे जिल्ह्यात ज्ञात असलेले प्रदिप कंद हे भारतीय जनता पक्षाचे शिरुर हवेलीचे नेते असून ते पक्षाचे एकनिष्ठेने काम करतात परंतु जाणून बुजून अज्ञात समाज कंटकाने बॅनर बनवून ते विविध समाज माध्यमांवर प्रसारित करून आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने समाजात अपप्रचार करण्यात येत असुन जनमाणसात प्रदिपदादा कंद यांची बदनामी करण्यात येत आहे या पोस्ट विषयी किरण झुरूंगे यांना समजल्यावरती त्यांनी त्वरीत लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी अर्ज केला व संबंधित अज्ञात समाजकंटकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे पुढील तपास लोणीकंद पोलीस करत आहेत .