शिरूर विधानसभा मतदारसंघासाठी चंद्रशेखर घाडगे यांचा उमेदवारी अर्ज दाखल 

लोणीकंद: ता. २८ शिरूर विधानसभा मतदारसंघासाठी संभाजी ब्रिगेडचे अधिकृत उमेदवार संभाजी ब्रिगेडचे पुणे उत्तर जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर ज्ञानेश्वर घाडगे यांनी मोठ शक्तीप्रदर्शन करत शिरूर विधानसभेच्या निवडणूक निर्णय अधिकारी संगीता राजापूरकर व सहाय्यक निवडणूक अधिकारी तहसिलदार बाळासाहेब म्हस्के यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज सोमवारी (दि. २८ रोजी) दाखल केला.

 

शिरूर बाजार समिती आवारातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून उमेदवारी अर्ज दाखल केला, यावेळी शिरूर हवेली विधानसभा मतदासंघांतील यावेळी संभाजी ब्रिगेडचे शिरूर लोकसभा अध्यक्ष संदीप मुंगसे, शिरूर तालुकाध्यक्ष अक्षय गायकवाड, हवेली तालुकाध्यक्ष शिवाजी पवार, निलेश ढगे,जिल्हा उपाध्यक्ष रणजित बिराजदार, उपाध्यक्ष निलेश कांबळे, सोशल मीडिया अध्यक्ष अशोक फाजगे,दिनकर केदारी, सुशील घाडगे, अंकुश हाके, जालिंदर कांबळे, संतोष सुर्यवंशी, आदम तांबोळी,सुजाता मोहिते,आदित्य माने, यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें