कोंढवा बुद्रुक येथे शिक्षकदिनानिमित्त पुरस्कर प्रदान करताना जालिंदर कामठे व मान्यवर.(छाया:संदिप डोके हडपसर)
हडपसर प्रतिनिधी संदीप डोके
कोंढवा बुद्रुक ता. हवेली: येथे डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीचे औचित्य साधुन साजऱ्या होणाऱ्या या शिक्षकदिनीमित्त वसंतदादा पाटील प्रतिष्ठान संचलित प्राथमिक, माध्यमिक, सिनियर महाविद्यालयातील शिक्षकांना आदर्श पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रम प्रसंगी शिक्षण हा जीवनाचा आधारस्तंभ आहे. अशा पवित्र कार्यात सहभागी असलेल्या प्रत्येक शिक्षकाला शिक्षक दिनाप्रसंगी नतमस्तक झाले पाहिजे व त्यांचे आदर्श व्यक्तिमत्त्व आपल्या सर्वांसाठी आदर्श ठरावे असे मत वसंतदादा पाटील प्रतिष्ठाणचे अध्यक्ष,बारामती लोकसभा मतदार संघाचे भाजपा प्रभारी जालिंदर कामठे यांनी व्यक्त केले.
सदरील कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव मरळ, सुखदेव लोणकर, सदाशिव कामठे,प्राचार्य भानुदास रिठे,प्राचार्य डॉ. प्रमोद बोत्रे, मुख्याध्यापिका सुरेखा कोलते, सुनीता रायुडू, मुख्याध्यापक संतोष आबनावे, नंदकुमार पांडे, प्रभारी प्राचार्य विनायक हिरे यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर बंधूभगिनी आदी मान्यवर उपस्थित होते.