लोणीकंद (ता. हवेली) शिरूर हवेली विधानसभा मतदार संघात निवडणुकीचे वारे जोरदार वाहत असून राजकीय वातावरण मात्र चांगलेच तापले असून शिरूर हवेली तालुक्यातील राजकीय घडामोडींकडे सर्व मतदार संघाचे लक्ष लागले असून जागा कोणाला सुटणार आणि उमेदवार कोण असणार याबाबत चर्चांना उधाण आले असून मोठा तगडा उमेदवार मिळणार असून लढत मात्र काटे की टक्कर होणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.
महायुतीच्या वतीने नेते कार्यकर्ते उमेदवार कोण आहे यापेक्षा महायुतीचा उमेदवार कोणीही असू द्या लढत जोरदार होणार असून यासाठी जीवाचे रान करत विजयाची पताका निश्चित फडकवू असा निर्धार केला आहे शिरूर हवेलीतील नेते व कार्यकर्ते, मतदार लोकनेते माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या आठवणींना उजाळा देत भावनिक होत असून पाणावलेल्या डोळ्यांनी साहेब तुम्ही नसलात तरी तुमच्या सहवासाच्या आठवणी, त्यांच्यावरील प्रेम अंतःकरांतून असून साहेब तुमचा पराभवाचा वचपा नक्कीच काढणार, साहेब यावर्षी निष्ठावंत कार्यकर्ता आणि सहकारी म्हणून कमळ फुलवणार आहे.
साहेब तुम्ही नाहीत तर कार्यकर्त्यांच्या स्वप्नांचा चिखल होत असून यावर्षी मात्र मतदार संघात कमळ फुलवायचे आणि साहेबांचे स्वप्न पूर्ण करायचे , साहेबांच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी, कमळ फुलवण्यासाठी आम्ही जीवाचे रान करणार असल्याची प्रतिक्रिया देत फडणवीस साहेब तुम्ही फक्त उमेदवार द्या.. देहाची कुर्वंडी करून कमळ फुलवण्याचा निश्चय व्यक्त करत आहे.
महायुतीच्या वतीने उमेदवार असेल त्याचे काम करत प्रखर लढत देण्याचे काम करण्यात येईल असा कार्यकर्त्यांनी निश्चय व्यक्त केला आहे.हवेलीच्या दमदार उमेदवाराच्या नावाची घोषणा झाल्यावर रंगतदार लढत होणार असून उमेदवारी कोणाला मिळेल यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.