२०२४/२०२५ हंगामात उसाला उच्चांकी दर देऊ; चेअरमन बाबुराव बोत्रे
शिरूर तालुका प्रतिनिधी
मांडवगण फराटा (ता. शिरूर) गौरी शुगर अँड डिस्टीलरीज प्रा. लि. हिरडगाव युनिट ४ ता. श्रीगोंदा जि. अहिल्यानगरच्या वतीने शिरूर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सन २०२३/ २०२४ गळीत हंगामातील ऊस गळितासाठी दिला असेल ,अशा सर्व ऊस उत्पादकांना त्यांच्या टनेजनुसार दिवाळीची मोफत साखर वाटप मांडवगण फराटा येथे कारखान्याचे चेअरमन माननीय बाबुराव बोत्रे पाटील यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
यावेळी घोडगंगा मा उपाध्यक्ष गोविंदराव काळे, कारखान्याचे जनरल मॅनेजर रोहिदास यादव साहेब, श्रीगोंदा साखर कारखाना माजी संचालक विजयसिंह मोकाशी,भाजपाचे युवकचे पुणे जिल्हा अध्यक्ष एकनाथ शेलार, मा. संचालक बाळासाहेब फराटे, मा. पंचायत समिती सदस्य लक्ष्मण फराटे, शेतकी अधिकारी नवनाथ देवकर,,विकास क्षीरसागर, दत्तात्रय गदादे, प्रमोद गरुड, नवनाथ गायकवाड, इनामगावचे ढवळे, बाभुळसर बु. उपसरपंच महेंद्र रणदिवे, प्रकाश नागवडे, दिलीप फराटे, शशिकांत चकोर,समीर जकाते, गदादे सर्व कारखान्यांतील कर्मचारी वृंद व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना कारखान्याचे चेअरमन माननीय बाबुराव बोत्रे पाटील यांनी सांगितले की साखर कारखाना चालवण्यासाठी ऊस उत्पादक शेतकरी हा दुवा समजला जाऊन , कामगारांना वेळेवर पगार तसेच ऊस वाहतूकदारांना वेळेवर पेमेंट, बँकेची वेळेवर परतफेड, ऊस उत्पादकांचे मस्टर भरला की लगेच पेमेंट अशा पद्धतीने नियोजन केल्यामुळेच तुमच्या सर्वांच्या सहकार्याने टोटल ९ कारखाना युनिट अगदी नियोजन पद्धतीने चालून एक आदर्श निर्माण करण्याचे आम्ही प्रयत्न करत आहोत. तसेच सर्व ऊस उत्पादकांची, कामगारांची, ऊस वाहतूकदारांची मोफत साखर देऊन दिवाळी गोड केली जाईल असे यावेळी सांगितले. तसेच १ते३० टनापर्यंत १०किलो, ३१ते५० टनापर्यंत २० किलो, ५१ते १००टनापर्यंत३० किलो,१०१ ते१५१टनापर्यंत४०किलो,१५१ते२०० टनापर्यंत ५०किलो, २०१ते ३००टनापर्यंत ७०किलो आणि ३०१ च्या पुढे १००किलो मोफत साखर देणारा राज्यात पहिला कारखाना आहे.तसेच शिरूर तालुक्यामधील पूर्व भागात ऊसाचे उच्चांकी उत्पादन असून आमच्या हिरडगाव कारखान्याला सर्वांचा ऊस गाळपसाठी नेण्याचा प्रयत्न केला जाईल असे सर्व कामगारांना यावेळी त्यांनी आदेश देण्यात आले. २०२४/२०२५ चालू हंगामात उसाला उच्चांकी दर देऊ अशी ग्वाही चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील यांनी दिली.