Home ताज्या बातम्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने संभाजी ब्रिगेड पुणे उत्तर जिल्हा पदाधिकारी ( कोअर कमिटी ) ची बैठक संपन्न झाली

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने संभाजी ब्रिगेड पुणे उत्तर जिल्हा पदाधिकारी ( कोअर कमिटी ) ची बैठक संपन्न झाली

0
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने संभाजी ब्रिगेड पुणे उत्तर जिल्हा पदाधिकारी ( कोअर कमिटी ) ची बैठक संपन्न झाली

पुणे, संभाजी ब्रिगेड पुणे उत्तर जिल्हा पदाधिकारी ( कोअर कमिटी ) ची बैठक जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे यांच्या उपस्थिती मध्ये संपन्न झाली, यावेळी पुणे जिल्ह्यातील शिरूर, खेड, भोसरी व या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला,तसेच महानगरध्यक्ष अविनाश मोहिते यांच्या सूचनेनुसार पुणे शहरातील आठ पैकी हडपसर, व वडगावशेरी या दोन मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला, शहरातील उर्वरित सहा विधानसभा मतदारसंघाचा उद्या स्वारगेट येथे होणाऱ्या बैठकीत आढावा घेण्यात येणार आहे,

संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष ऍड मनोजदादा आखरे व महासचिव सौरभदादा खेडेकर हे जो आदेश देतील तो आदेश अंतिम असेल असा निर्णय सर्वांच्या एकमताने घेण्यात आला, २०२४ च्या निवडणुकीत शिरूर मतदारसंघात संभाजी ब्रिगेडला मानणारा मतदार मोठ्याप्रमाणात आहे, मतदारसंघातील अनेकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे, तसेच बेरोजगारी, मराठा आरक्षण, वाहतुक कोंडी यावर अनेक वेळा संभाजी ब्रिगेडच्या वतीने आवाज उठवला आहे,असे मत जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे यांनी वेक्त केले,

खेड, व भोसरी मतदारसंघात अनेक कार्यकर्ते संभाजी ब्रिगेडला जोडले गेले आहेत, पुणे शहरातील वडगावशेरी मतदारसंघात येणाऱ्या ग्रामीण भागातील वडगाव शिंदे, निरगुडी,मांजरी खुर्द या गावात व आयटी पार्क असलेले लोहगाव, खराडी चंदननगर या ठिकाणी महानगरध्यक्ष अविनाश मोहिते व चंद्रशेखर घाडगे यांच्या नेतृत्वात संभाजी ब्रिगेडचे शेकडो कार्यकर्ते जोडले गेले आहेत,

हडपसर मतदारसंघातील मुंढवा येथील भूमिपुत्र असलेले शिवाजी पवार हे आठ ते दहा वर्षांपासून संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून मुंढवा, व केशवनगर येथे संघटन वाढीसाठी व तेथे राहणाऱ्या लोकांच्या प्रश्नासाठी काम करत आहेत,

या सर्व मतदारसंघाचा आढावा घेणाऱ्या बैठकी ( उत्तर जिल्हा कोअर कमिटी ) मध्ये जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे, जिल्हा सचिव निलेश ढगे, जिल्हा उपाध्यक्ष निलेश कांबळे, जिल्हा कार्याध्यक्ष साजिद सय्यद, शिरूर लोकसभा अध्यक्ष संदीप मुंगसे, मावळ लोकसभा अध्यक्ष दिनकर केदारी, लोकसभा निरीक्षिक शिवाजी पवार, सोशल मीडिया जिल्हा अध्यक्ष अशोक फाजगे, जिल्हा उपाध्यक्ष रणजित बिराजदार, अक्षय गायकवाड यांचा समावेश होता