शिरूर प्रतिनिधी
ता १९ मांडवगण फराटा ता शिरूर जि पुणे येथे श्री वाघेश्वर ग्रामविकास प्रतिष्ठान या संस्थेचा १६ वा वर्धापन दिन फराटे पाटील ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मध्ये रविवारी दि. २० ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ११.३० वाजता माननीय बी जे कोळसे पाटीलसाहेब मा. न्यायमूर्ती मुंबई उच्च न्यायालय यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे .
यावेळी प्रमुख उपस्थिती माननीय अक्षय वालेसाहेब भारतीय वन सेवा अधिकारी (आयपीएस),डॉ .टी एम देशमुखसाहेब अध्यक्ष लोक कल्याण मानव सेवा समिती महाराष्ट्र राज्य, (कोहिनूर ग्रुप सीएमडी) आदी उपस्थित राहणार आहेत. तरी पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ पालक वर्ग व विद्यार्थी यांनी उपस्थित राहण्याचे यावेळी संस्थेचे अध्यक्ष राजीव पाटील फराटेसाहेब यांनी आव्हान केले आहे.
राजीव पाटील फराटेसाहेब यांचे बरोबर अगदी तन्मनाने काम करणारे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर उर्फ पिंटू पाटील फराटे ,संस्थेचे सचिव मृणालताई पाटील फराटे, विश्वस्त कॅम्पस संचालक संग्रामराजे धावडेसर यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. तसेच संस्थेचा आतापर्यंतचा इतिहास पाहिला असता सुसज्ज इमारत, उच्च शिक्षित शिक्षक, विद्यार्थी आणि विद्यार्थ्यींना स्वतंत्र वस्तीगृह व जेवणाची उत्तम अशी सोय प्रतिष्ठानच्या माध्यमातून केली आहे.
विविध राज्यातून या ठिकाणी मुलांचा ओघ वाढला असून विद्यार्थ्यांना पूर्ण सुरक्षित, सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या नजरेत शिरूर तालुक्याच्या भीमा नदी काठाच्या कुशीत असे मांडवगण फराटा येथे इन्स्टिट्यूट उभारून ग्रामीण भागाला चांगल्या प्रकारची सोय उपलब्ध करून व शहरी इन्स्टिट्यूटचा पालक वर्ग, विद्यार्थ्यांना न सोसणारा खर्च तसेच ७० ते ७५ टक्के मार्क पडणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देताना विद्यार्थ्यांना दत्त घेऊन त्यांच्या पुढील शिक्षणाचा संपूर्ण खर्चाचा भार संस्थेच्या माध्यमातून केला जातो. तसेच या संस्थेच्या माध्यमातून जिल्हाधिकारी आयपीएस अधिकारी उत्पादन शुल्क अधिकारी असे तब्बल नऊ अधिकारी या संस्थेच्या माध्यमातून घडले, अशा प्रकारची शिक्षणाची सोय होण्यासाठी संस्थेने फराटे पाटील इन्स्टिट्यूटची उभारणी केली असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष राजीव पाटील फराटे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.