Home ताज्या बातम्या शिरूर मतदार संघातून भाजपकडून प्रदीप कंद यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता

शिरूर मतदार संघातून भाजपकडून प्रदीप कंद यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता

0
शिरूर मतदार संघातून भाजपकडून प्रदीप कंद यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता

लोणीकंद : ता १७ संपूर्ण राज्यात बहुचर्चित शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत सरळ लढत होणार आहे. हे जवळपास स्पष्ट असून पक्षांतर्गत बंडखोरी टाळण्यासाठी पक्ष प्रमुखांची डोकेदुखी वाढली आहे. मध्यंतरी शिरूर हवेली मतदार संघात अजित पवार उतरणार असल्याचे संकेत दिल्याने भाजपचे पदाधिकारी कुठेतरी नाराज होते. मात्र आता अजित पवार हे बारामती विधानसभा लढ विनार असल्याने शिरूर चे जागेसाठी भाजपचे इच्छुक उमेदवार माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. यामुळे मतदार संघातील भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

शिरूर हवेली मतदार संघात महायुतीकडुन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दादा पाटील फराटे, चंदन सोंडेकर, शांताराम कटके इच्छुक आहेत. मात्र भाजपचे राज्याचे सर्वेसर्वा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपची संभाव्य ताकद व मतदार संघातील पक्षा अंतर्गत सर्व्हेत या जागेवर भाजपासाठी अनूकुल वातावरण प्राप्त झाल्याने जागा वाटपात ही जागा भाजप पक्षाकडे ठेवण्याचा आग्रह धरल्याने दिल्ली हायकमांडने या जागेसाठी शिक्कामोर्तब केले. त्यामुळे विधानसभेसाठी प्रदीप कंद यांना ही उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडी विधानसभेचे उमेदवार म्हणुन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने विद्यमान आमदार अशोक पवार यांच्या नावावर आधीच शिक्कामोर्तब झाले आहे. त्यांचा प्रचार यंत्रणेचा एक फेरा झाला आहे तर दुसरीकडे महायुतीकडून उमेदवार निश्चित नाही.

महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसला जागा मिळाल्यावर अजित दादा हे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे ज्ञानेश्वर कटके यांचा राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश करून घेऊन कटके यांना उमेदवारी मिळणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. मात्र आयात उमेदवार आणल्यास मतदार संघात मोठी बंडखोरी निर्माण होण्याची शक्यता आहे. अजित पवार राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनाच उमेदवारी मिळावी बाहेरचा उमेदवार आयात केल्यास बंडखोरी अटळ असल्याचे कार्यकर्त्यांनी म्हटले आहे. ही जागा अजित पवार गटालाच मिळावी अशी पदाधिकाऱ्यांची बैठकीत मागणी केल्याने अजित पवारांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. परंतु महायुतीतील जागा राष्ट्रवादीला सुटणार की भाजपला हेच अजून गुलदस्त्यात आहे. त्यामुळे भाजपचे प्रदीप कंद यांना वॉच अँड वेट करावे लागणार आहे.