भारतीय जनता पार्टी वाघोली शहर अध्यक्षपदी विजय जाचक यांची नियुक्ती

केतन जाधव यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करत अध्यक्षपदावरून निलंबन; तालुकाध्यक्ष शाम गावडे

लोणीकंद; भारतीय जनता पार्टी वाघोली शहराध्यक्षपदी असणारे केतन जाधव यांनी पक्ष विरोधी काम केल्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली केतन जाधव यांची शहराध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आली व रिक्त झालेल्या जागेवर सामाजिक कार्यात कार्यरत असणारे विजय जाचक यांची नियुक्ती करण्यात आली त्यांना भाजपा हवेली तालुका अध्यक्ष श्याम गावडे यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले

यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, क्रीडा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष संदीप भोंडवे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती रवींद्र कंद, संजय कंद, सुरेश कंद, ओंकार कंद, आदी मान्यवर उपस्थित होते.

केतन जाधव यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्ष विरोधी काम केल्यामुळे भाजपाने शिस्तभंगाची कारवाई करत पाच वर्षासाठी भारतीय जनता पक्षा मधून निलंबित करण्यात आल्याचे पत्र तालुकाध्यक्ष श्याम गावडे यांनी काढले तसेच भाजपचे किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष दादासाहेब सातव यांच्यावर देखील शिस्तभंगाची कारवाई करून निलंबन करण्यात यावे यासाठी भाजपच्या जिल्हा व तालुका स्तरावरील पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे मागणी केली आहे.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें