Home बड़ी खबर संचालक प्रदिपदादा कंद यांच्या संकल्पनेतून वाडेबोल्हाईत कर्तुत्ववान व्यक्तींचा गुणगौरव सोहळा संपन्न

संचालक प्रदिपदादा कंद यांच्या संकल्पनेतून वाडेबोल्हाईत कर्तुत्ववान व्यक्तींचा गुणगौरव सोहळा संपन्न

0
संचालक प्रदिपदादा कंद यांच्या संकल्पनेतून वाडेबोल्हाईत कर्तुत्ववान व्यक्तींचा गुणगौरव सोहळा संपन्न

कै.राजेंद्र पठारे यांच्या स्मरणार्थ कै.धोंडीबा शिंदे प्रतिष्ठान,कै.बापू शिंदे मंचकडून यशस्वी आयोजन

दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती या संकल्पनेतून श्री क्षेत्र वाडेबोल्हाई(ता.हवेली) येथे कै.राजेंद्रशेठ पंढरीनाथ पठारे यांच्या स्मरणार्थ तसेच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा पिडीसीसी बँकेचे संचालक प्रदिप कंद यांच्या संकल्पनेतून तर कै.धोंडिबादादा शिंदे प्रतिष्ठान व व्यवसाय महर्षी कै.बापु मुक्ताजी शिंदे मंचच्या वतीने विविध क्षेत्रांमध्ये कर्तुत्व गाजवणाऱ्या व्यक्तींचा ‘गुणगौरव व कृतज्ञता सन्मान सोहळा उत्साहात संपन्न झाला.

कला,क्रीडा,सामाजिक,शैक्षणिक,शासकीय, प्रशासकीय,उद्योग,व्यवसाय,आदी क्षेत्रामध्ये शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या नामवंत व गुणवंत व्यक्तींचा गौरव महाराष्ट्र राज्य क्रीडा गौरव पुरस्कार विजेते पंढरीनाथ उर्फ आण्णासाहेब पठारे,जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदिप कंद,माजी आमदार बापूसाहेब पठारे,यशवंत कारखान्याचे चेअरमन सुभाष जगताप,माजी नगरसेवक महेंद्र पठारे,महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष पै.संदिप भोंडवे,इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे,माजी उपसभापती रविंद्र कंद,युवा नेते संतोष भरणे,युवा नेते वैभव पठारे,सरपंच वैशाली केसवड,उपसरपंच किर्ती पायगुडे यांच्या हस्ते आकर्षक सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

याप्रसंगी माजी सरपंच संतोष कुंजीर,मोहन तापकीर,माजी उपसरपंच संजय भोरडे,वाडेबोल्हाई दिंडीचे संचालक विजय पायगुडे,माजी उपसरपंच विद्याधर गावडे,बोल्हाई देवस्थानचे चेअरमन बळीराम गावडे,ज्येष्ठ नेते बापूसाहेब भोर,युवा नेते प्रदिप शिंदे,राहुल शिंदे,काका गावडे,माजी उपसरपंच तथा सदस्य संदिप गावडे,माजी उपसरपंच तथा सदस्या मोनाली भोर(गावडे),ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार भोर,सदस्य संतोष चव्हाण,सदस्य गणेश भोरडे,सदस्या सोनाली राहुल रिकामे,सदस्या स्वाती शरद इंगळे,आदी बहु संख्येने मान्यवर उपस्थित होते.अशी माहिती आयोजक वाडेबोल्हाईचे माजी उपसरपंच महेश शिंदे व माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सुमित शिंदे आदी आयोजक यांनी दिली.

हा सोहळा यशस्वी पार पाडण्यासाठी सोहळ्याचे आयोजक महेश शिंदे,सुमित शिंदे,शेखर शिंदे,गणेश शिंदे,राजेंद्र शिंदे,डॉ.सागर शिंदे,निलेश सावंत,अनिल शिंदे,कैलास शिंदे,अमित शिंदे,अभिजित शिंदे,सुरज शिंदे,चेतन शिंदे,सोमनाथ शिंदे,प्रतिक शिंदे,शुभम शिंदे,श्रीकेश शिंदे,ओम शिंदे,रोहित शिंदे,पृथ्वीराज कदम,सार्थक शिंदे,आदीनी परिश्रम घेतले. कैलासवासी राजेंद्र पठारे यांच्या नावाने भाविका ळात प्रतिष्ठानची स्थापना व्हावी व त्यातून सामाजिक उद्देश साधला जावा अशी संकल्पना प्रदीप कंद यांनी मांडली त्याला मान्यता देऊन पंढरीनाथ पठारे यांनी प्रतिष्ठानला सुमारे पाच लाख रुपयांची देणगी जाहीर केली, तसेच आगामी काळात प्रतिष्ठानच्या माध्यमातून नवनवीन उपक्रम आयोजित करण्याचे आश्वासन कार्यक्रमाचे आयोजक महेश शिंदे यांनी दिले.

सोहळ्यातील विविध क्षेत्रातील गौरव व सत्कारमूर्ती:-

आय.एफ.एस.अधिकारी अक्षय भोरडे,परभणी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे,सा.कार्यकर्ते रवींद्र माळवदकर,नॅनो तंत्रज्ञान शास्त्रज्ञ डॉ.प्रविण वाळके,एवरेस्ट गिर्यारोहक किशोर धनकुडे,हिंद व महाराष्ट्र केसरी पै.अभिजित कटके,सहाय्यक विक्रीकर आयुक्त विजय गोते,कृषी पर्यवेक्षक नविनचंद्र बोऱ्हाडे,पोलिस उपनिरीक्षक अविनाश निकाळजे,पोलिस उपनिरीक्षक अझहर मुलानी,उत्पादक शुल्क निरीक्षक हेमा खुपसत,वनरक्षक साक्षी इंगळे,रेल्वे अधिकारी सफर खान,यशस्वी उद्योजक जालिंदर कातकडे,यशस्वी उद्योजक भानुदास रानवडे,राष्ट्रीय खो खो प्रशिक्षक अविनाश करवंदे,प्रहार दिव्यांग संघटना धर्मेंद्र सातव,वैद्यकीय अधिकारी महेश वेताळ,वैद्यकीय अधिकारी सचिन सूर्यवंशी,यशस्वी उद्योजक जोगेश्वरी मिसळ संस्थापक सचिन हरगुडे,शिवनेरी मिसळ संस्थापक सोमनाथ शेलार,सातव लस्सीवाले गणेश सातव,जिजाऊ डेअरी उद्योजक प्रमोद पाबळे.