Home ताज्या बातम्या केसनंद येथे विविध विकास कामांचा उद्घाटन शुभारंभ संपन्न

केसनंद येथे विविध विकास कामांचा उद्घाटन शुभारंभ संपन्न

0
केसनंद येथे विविध विकास कामांचा उद्घाटन शुभारंभ संपन्न

दि.१३ हवेली तालुक्यातील केसनंदचे विद्यमान सरपंच प्रमोद हरगुडे यांच्या विशेष प्रयत्नातून केसनंद ग्रामपंचायत संपूर्ण हवेली तालुक्यामध्ये एक विशेष ग्रामपंचायत ठरली असून त्यामुळे केसनंद विकासाकडे भरारी चालू आहे.नुकताच ग्रामपंचायतच्या माध्यमातून सरपंच प्रमोद हरगुडे यांच्या वाढदिवसानिमित्त सुमारे तीन कोटी रुपये विकास निधीचे लोकार्पण सोहळा माजी खासदार तथा म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला.यामध्ये डेनफोस कंपनीच्या सीएसआर फंडातून ग्रामपंचायतीला चार ओझोन गाड्या व एक रुग्णवाहिका भेट देण्यात आली.वायका कंपनीच्या सी.एस.आर फंडातून अत्याधुनिक सुसज्ज दुमजली अंगणवाडीचे लोकार्पण मोठ्या उत्साहात संपन्न झाले.त्यामुळे शिक्षण आरोग्य आणि स्वच्छता अशी त्रिसूत्री असणारी तालुक्यातीलच नव्हे तर जिल्ह्यातील एकमेव ग्रामपंचायत म्हणून केसनंद गावचा बोलबाला झाला आहे,त्यामुळे एखाद्या नगरपंचायतीपेक्षा जास्त सुख सुविधा असणारी एकमेव ग्रामपंचायत म्हणून केसनंद ग्रामपंचायत ओळखली जाणार आहे.सरपंच प्रमोद हरगुडे यांनी केलेले विशेष प्रयत्नामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.अशी माहिती देताना युवा सेनेचे हवेली तालुका प्रमुख अनिल जाधव यांनी सांगितले.

केसनंद येथे कचरा व्यवस्थापन,बेरोजगारीचा प्रश्न,वाढीव पाणी योजनेला मान्यता,वृक्षारोपण,सांडपाणी व्यवस्थापन,अंतर्गत रस्ते,व्यायाम शाळा, रुग्णवाहिका तसेच ग्रामस्थांच्या सहकार्यातून अतिक्रमण दूर करण्यात सरपंच प्रमोद हरगुडे व त्यांच्या ग्रामपंचायत सदस्य सहकाऱ्यांना यश आले आहे.एक वर्षाच्या कालावधीत जवळपास पाच कोटी रुपयांच्या विकास कामांचा डोंगर सरपंच हरगुडे यांनी उभा केला आहे.तसेच सामाजिक संस्थांनी देखील प्रमोद हरगुडे यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.केसनंद येथील तीन कोटीच्या विविध विकास कामांचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी सरपंच प्रमोद हरगुडे यांचा वाढदिवस साजरा करीत उपस्थित अनेक मान्यवरांनी त्यांचा सन्मान करीत त्यांना शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी अजय मोरे, हवेलीचे गटविकास अधिकारी भूषण जोशी,युवा सेनेचे नेते किरण साळी,माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके,माजी सरपंच मिलिंद हरगुडे,शिवसेनेचे हवेली तालुका प्रमुख विपुल शितोळे,माजी सरपंच सचिन हरगुडे,युवा सेनेचे तालुका प्रमुख अनिल जाधव,डेनफॉस कंपनीचे जयंत नातू,कुंडलिक थोरात,रमेश गोते,आदी विविध गावचे सरपंच,उपसरपंच,तसेच केसनंद ग्रामपंचायत आजी माजी पदाधिकारी,ग्रामस्थ बहु संख्येने उपस्थित होते.