हडपसर सविता मोरे यांना नियुक्तीपत्र देताना खासदार सुप्रिया सुळे व शहराध्यक्ष प्रशांत जगताप(छाया संदिप डोके)
हडपसर प्रतिनिधी: संदिप डोके
हडपसर दि.७ येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट ) हडपसर विधानसभा मतदारसंघाच्या महिला अध्यक्षपदी वंदना मोडक, तर कार्यध्यक्षपदी सविता मोरे, हडपसर विधानसभा अध्यक्षपदी प्रविण तुपे, विधानसभा कार्याध्यक्ष हेमंत बधे हडपसर विधानसभा मतदारसंघातील आयोजित कार्यक्रमात निवडीचे नियुक्तीचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री खा.शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते देण्यात आले.
याप्रसंगी खासदार वंदना चव्हाण, अंकुश काकडे, पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, महिला शहराध्यक्ष मृणाल वाणी आदिसह शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) शहराध्यक्षा प्रशांत जगताप यांच्या पुढाकारातून कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
हडपसर विधानसभा मतदारसंघ शरद पवार यांच्या विचारांचा आहे, पदाधिकारी सोडून दुसऱ्या गटात गेले चांगल्या सक्षम कार्यकर्त्यांना हडपसर विधानसभा मतदारसंघात नेमणूक केली असून आगामी काळात चांगल्या पद्धतीने बांधणी करून निवडणुकामध्ये यश संपादन केले जाईल असे प्रतिपादन शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केले.
हडपसर विधानसभा मतदारसंघात अध्यक्ष म्हणून काम करण्याचा अनुभव आहे, शरद पवार व प्रशांत जगताप यांनी संधी दिली आहे मतदारसंघात सर्व जातीधर्मांच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन कात्रज पासून मांजरी पर्यंत सर्वसमावेशक कार्यकारिणी करणार असे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रवीण तुपे यांनी सांगितले.
जास्तीत जास्त महिलांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवारांच्या विचारांशी जोडणार आणि हडपसर मध्ये बांधणी करणार असल्याचे महिला अध्यक्षा वंदना मोडक, कार्याध्यक्ष सविता मोरे यांनी सांगितले.