भविष्यात “भारतरत्न सर रतनजी टाटा गार्डन” या नावाने गार्डन करणार; चंद्रकांत वारघडे
हवेली तालुक्यातील बकोरी येथील वृक्ष मित्र चंद्रकांत वारघडे यांनी बकोरितील वनराईत भारतरत्न सर रतनजी टाटा यांचे स्मरणार्थ वड, पिंपळ,करंज, कडुलिंब, चिंच, अर्जून अशी ८६ झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले तसेच भविष्यात त्याठिकाणी “भारतरत्न सर रतनजी टाटा गार्डन” या नावाने गार्डन करणार असल्याचे वारघडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
यावेळी वृक्षारोपण कार्यक्रमासाठी वनविभागाचे धनपाल शिवले माहिती सेवा समितीचे राज्य उपाध्यक्ष संजय हरगुडे, लक्षद्वीप ॲकडमीचे देशमुख सर व त्यांचे विद्यार्थी आदी मान्यवर उपस्थित होते.
बकोरीत वनराई प्रकल्प साकारत आहे आतापर्यंत ७०००० झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले आहे तसेच जलसंधारणाचे काम सुद्धा मोठ्याप्रमाणात करण्यात आले आहे त्यामध्ये ३००० पेक्षा जास्त समांतर चर घेण्यात आले आहे,एक कोटी लीटर क्षमतेचा छत्रपती जलाशयाचे काम पुर्ण झाले आहे. या वनराईत भारतरत्न सर रतनजी टाटा यांचे स्मरणार्थ वृक्षारोपण करण्यात आले भविष्यात त्याठिकाणी “भारतरत्न सर रतनजी टाटा गार्डन” या नावाने गार्डन करणार असल्याचे वारघडे यांनी सांगितले, दरवर्षी प्रमाणे आपट्याच्या झाडाची पुजा करुन विजयादशमी सन साजरा करण्यात आला, सर्वांनी आपट्याच्या झाडाची पाने तोडा परंतु झाड फांद्या तोडु नये असे आव्हान वारघडे यांनी केले.