हरियाणातील अभूतपूर्व यशाबद्दल लोणीकंद मध्ये भाजपा कार्यकर्त्यांचा आनंदोत्सव साजरा 

लोणीकंद, भारतीय जनता पार्टीने हरियाणा राज्यात सलग तिसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळवले त्यासोबतच जम्मू काश्मीर मध्ये यश संपादक केल्याबद्दल हवेली तालुक्यातील लोणीकंद येथे भाजपा कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव जल्लोषात साजरा केला.

याप्रसंगी भाजपचे शिरूर हवेली मतदार संघाचे निवडणूक प्रमुख प्रदीपदादा कंद यांच्यासह भाजपाचे आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते विजयाच्या जल्लोषात सहभागी झाले होते.

एक्झिट पोलच्या पोल ऑफ पोललाही अनपेक्षित असलेला निकाल हरियाणातील जनतेने दिला, गेल्या दहा वर्षांपासून हरियाणात भाजपाची सत्ता असून भाजपने हरियाणात तिसऱ्यांदा हा नेत्रदीपक विजय मिळवला असल्याचे प्रदीपदादा कंद यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें