शिरूर-हवेली मतदार संघात जागेसाठी महायुतीत; जोरदार रस्सीखेच सुरू

पुणे, १९८ शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत सरळ लढत होणार आहे त्यामुळे सर्वच पक्षांनी तयारी सुरू केल्याचे चित्र दिसून येत आहे परंतु महायुतीचा चेहरा ठरल्यावर चित्र स्पष्ट होईल

महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अशोक पवार यांची उमेदवारी निश्चित झालेली आहे. तर महायुतीकडून अनेक जण इच्छुक असल्याने महायुतीचा उमेदवार कोण असेल याचा निर्णय झालेला नाही शिरूर-हवेली हा भाजपचा पारंपरिक मतदारसंघ असून, भाजप या ठिकाणी निवडणूक लढवत आहे. त्यामुळे हा मतदारसंघ आमचा असल्याचा दावा भाजप पदाधिकारी यांनी ठोकला आहे. तर विद्यमान आमदार राष्ट्रवादीचा असल्याने अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मतदारसंघावर हक्क सांगितला जात आहे महायुतीत हा मतदारसंघ कोणाकडे राहणार, यावरच जोरदार रस्सीखेच सुरू असून भविष्यात राजकीय गणिते बदलणार आहेत.

अजित पवार शिरूर मतदार संघातून इच्छुक असल्याने अनेक दिवसापासून मतदार संघात मोर्चे बांधणी केलेले भाजपचे शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघाचे प्रचारप्रमुख प्रदीप कंद आता पुढील काळात काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे आहे. तसेच शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिरूर-हवेली विधानसभा समन्वयक माऊली कटके निवडणूक लढविण्यास इच्छुक असून तेही पुढील काळात काय भूमिका घेतात ते सुद्धा खूप महत्वाचे आहे, तिरंगी लढत झाल्यास निवडणूक अतिशय रंगतदार होणार असली, तरी महायुतीचा चेहरा ठरल्यावर चित्र स्पष्ट होईल.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें