शिरूर तालुक्यातील वाजेवाडी / मांजरेवाडी येथे विविध मंजूर विकास कामाचे भूमिपूजन उपस्थित मान्यवर व शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शिरूर तालुका अध्यक्ष विश्वासकाका ढमढेरे, वढू बुद्रुक गावचे सरपंच प्रफुल्ल शिवले, आपटी गावचे सरपंच अतुल ढगे, मा. आदर्श सरपंच धर्मराज वाजे,मा. सरपंच आबासाहेब वाजे, विद्यमान सरपंच पूनम चौधरी, उपसरपंच मंगल तिखे, मा. उपसरपंच रामदास मांजरे, सदस्या श्वेता मांजरे, सुरेखा मांजरे, राजू मांजरे, संतोष मांजरे, गणेश शेळके, शिवाजी भोंडवे, माऊली चौधरी, अण्णा मांजरे, आप्पासाहेब वाजे, बाबासाहेब मांजरे, नाना वाजे, सचिन वाजे, ज्ञानेश्वर वाजे, राहूल वाजे, ग्रामसेविकास अधिकारी लगड मॅडम, उपशाखा अभियंता गावडे साहेब यांच्यासह आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
गावातील उर्वरित अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी आमदार अशोक पवार यांनी ठेकेदारांना सूचना केल्या तसेच वाजेवाडी गावाच्या विकासासाठी विशेष निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले, तसेच निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल धर्मराज वाजे यांनी अशोक पवार यांचे आभार मानले. प्रास्ताविक आबासाहेब वाजे यांनी केले तर नितिन वाजे यांनी सर्वांचे आभार मानले.