वाघोली (ता. हवेली) येथे उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना मा.जिल्हाप्रमुख, शिरूर हवेली विधानसभा समन्वयक तथा मा. पुणे जिल्हा परिषद सदस्य माऊली आबा कटके यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतनानिमित्त शिरूर हवेलीतील जनसमुदाय आबांना शुभेच्छा देण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित होता.
यावेळी बाभुळसरच्या आदर्श सरपंच दिपाली महेंद्र नागवडे ,अमोल संभाजी फराटे चेअरमन छत्रपती विकास सोसायटी, गणेगावचे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते ऋषी निंबाळकर, शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते महेंद्र नागवडे, संदीप रामदास जगदाळे युवा सेना उपाध्यक्ष शिरूर तालुका, राज्य पत्रकार संघाचे शिरूर तालुका संघटक अलाउद्दीन अलवी , मोहन काका चव्हाण,सुनिल ढवळे,रत्नकांत खळदकर,दिपक कोकरे मा.सदस्य न्हावरा, आकाश सूर्यवंशी ,ऋषी लोखंडे, सोमनाथ साठे आदी उपस्थित होते .
माऊली आबा कटके यांनी शिरूर हवेलीतील माय माऊलींना उज्जैन यात्रा करून सर्वसामान्य जनतेला दर्शन घडवून आणले ,आबांच सर्व शिरूर हवेली मतदारसंघातून कौतुक केले जात आहे तसेच त्यांची शिरूर हवेली मतदारसंघात चांगल्याप्रकारे पकड आहे त्यांनी गोरगरिबांच्या मूलभूत गरजा तसेच वैद्यकीय मदत दिली आहे तसेच भीमा नदी काठ आणि घोडनदी काठ पूरग्रस्तांना व चक्र वादळात उडलेल्या घरावरील छतांच्या पत्रे नुकसान भरपाई दिलासा म्हणून यावेळी आबांनी आर्थिक मदत केली आणि उघडे पडलेल्या प्रपंचाला दिलासा देण्याचे काम केले असे दिपाली नागवडे आबांना शुभेच्छा देताना प्रसार माध्यमासी बोलताना सांगितले तसेच आबांना शिरूर हवेलीतील भावी आमदार, श्रावण बाळ म्हणून व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी सर्व उपस्थितांचे माऊली आबा युवा मंच यांच्या वतीने आभार मानण्यात आले.