Home ताज्या बातम्या वाघोली मध्ये विविध विकास कामांचे भूमिपूजन 

वाघोली मध्ये विविध विकास कामांचे भूमिपूजन 

0
वाघोली मध्ये विविध विकास कामांचे भूमिपूजन 

वाघोली ता हवेली येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या हस्ते संपन्न झाले ,विविध ठिकाणच्या जवळपास दोन कोटी रुपयांच्या विकास कामांचा यामध्ये समावेश आहे

यामध्ये प्रामुख्याने आरव शेरेटोन सोसायटी समोरील रस्ता करणे यासाठी ४ लाख ५० हजार रुपये,ओमकार सेरेनिटी ते गुरुकृपा सेवाश्रमकडे जाणारा रस्ता करणे यासाठी ६ लाख रुपये, दुर्वांकुर रेसिडन्सी समोरील रस्ता करणे यासाठी १० लाख रुपये,राज रेसिडन्सी समोरील रस्ता करणे यासाठी ८ लाख रुपये,राधेश्वरीनगरी ते ओंकार निर्वाना सोसायटी रस्ता करणे यासाठी लाख रुपये, बकोरी रोड ते कंद नगर लेन नंबर ६ कडे जाणारा रस्ता करणे यासाठी ७ लक्ष रुपये,वाघोली येथील घाडगे बंगला ते गुप्ता बंगल्याकडे जाणारा रस्ता करणे यासाठी १० लक्ष रुपये अशा विविध कामांचा समावेश आहे

याप्रसंगी आमदार अशोक पवार वाघोलीच्या माजी सरपंच वसुंधरा उबाळे, शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख युवराज , यांच्या सह ग्रामस्थ, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.