Home पुणे ग्रामीण बाभुळसर बु विविध कार्यकारी सेवा संस्थेची ६१ वी वार्षिक सर्वसाधारण संपन्न

बाभुळसर बु विविध कार्यकारी सेवा संस्थेची ६१ वी वार्षिक सर्वसाधारण संपन्न

0
बाभुळसर बु विविध कार्यकारी सेवा संस्थेची ६१ वी वार्षिक सर्वसाधारण संपन्न

शिरूर प्रतिनिधी/अल्लाउद्दीन अलवी

ता २६.बाभुळसर बु तालुका शिरूर जिल्हा पुणे येथील बाभुळसर बुद्रुक विविध कार्यकारी संस्थेची ६१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन भरत नारायणराव नागवडे यांच्या अध्यक्षतेखाली विठ्ठल रुक्मिणी मंदिर मध्ये आयोजित करण्यात आली 

यावेळी संस्थेचे मार्गदर्शक घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक रामचंद्र बाजीराव नागवडे यांच्या हस्ते स्वर्गीय संस्थापक संपतराव आबा नागवडे व स्वर्गीय वाल्मिक दादा नागवडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून उपस्थित सर्व सभासदांनी श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी प्रमुख उपस्थित संस्थेचे विद्यमान चेअरमन भरत नारायण नागवडे, व्हॉइस चेअरमन नंदाबाई रामदास नागवडे, सचिन बापू मचाले जिल्हाध्यक्ष किसान मोर्चा, मा चेअरमन विलास बापू नागवडे ,जयवंत नागवडे सरचिटणीस शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, अंकुश आबा नागवडे अध्यक्ष डॉ पद्मश्री आप्पासाहेब विद्यालय, अरुण दादा नागवडे अध्यक्ष तंटामुक्ती, कमाजी नागवडे ,बबन मामा टेकवडे ,महेंद्र हनुमंत नागवडे सरपंच, मा. चेअरमन फत्तेसिंग नागवडे ,रामभाऊ नागवडे नेते ,संतोष नागवडे, विलास नागवडे, अंकुश मचाले, विलास गवळी, सचिन नागवडे, बबन नागवडे, मंदाकिनी नागवडे ,शरद नागवडे ,मच्छिंद्र राऊत, लक्ष्मण रणदिवे, ज्ञानदेव शितोळे, हरिदास नागवडे, माधव नागवडे ,अभिजीत टेकवडे आदी संचालक व सभासद हरिभाऊ नागवडे ,लहू मचाले, विजय नागवडे, संतोष नागवडे ,मारुती नागवडे, जालिंदर रणदिवे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना संस्थेचे मार्गदर्शक रामचंद्र आण्णा नागवडे यांनी सांगितले की संस्था चालवत असताना संस्थेचे हिताचा विचार करून सभासदांनी वेळेत कर्जफेड करून संस्थेला सहकार्य करावे तसेच संस्थेला जास्तीचं नफा झाल्यास सभासदांना चांगल्या प्रकारे डीव्हीडंड वाटता येतो अशी यावेळी विनंती केली .तसेच संस्थेचे लेखाजोखा मांडताना संस्थेचे सचिव संजय नागवडे यांनी संस्थेची सांपत्तिक स्थिती संस्थेचे सभासद ५५४ असून संस्थेचे भाग भांडवल ६० लाख ९६ हजार २२०आहे ,बँक कर्ज २ कोटी ६१लाख ९२ हजार ८५१आहे तसेच जंगम इमारत मालमत्ता १७ लाख २५ हजार ६५६ एवढे आहे. तसेच संस्थेचा मुख्य विभाग आणि खत विभाग या माध्यमातून संस्थेला ढोबळ नफा ६लाख १९हजार ९९९ रुपये ७८ पैसे झाला आहे. तसेच संस्थेला लेखापरीक्षण वर्ग अ’ वर्ग मिळाला आहे. संस्थेने सभासदांना मध्य मुदत कर्ज वाटप, किसान क्रेडिट अल्पमुदत कर्ज पुरवठा आणि सभासदांना माफक दरामध्ये खताचा पुरवठा करून संपूर्ण संस्था संगणीकृत असल्याची माहिती यावेळी दिली. सभेचे सूत्रसंचालन माजी चेअरमन संतोष नागवडे यांनी केले आणि आभार संस्थेचे सचिव संजय बबन नागवडे यांनी मानले.