शिरूर प्रतिनिधी /अल्लाउद्दीन अलवी
ता. २५.बाभुळसर बु ता शिरूर जिल्हा पुणे येथील संत तुकाराम विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची ३० वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या सभागृहात संस्थेचे अध्यक्ष मनोहर संभाजी मचाले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली .
यावेळी परिक्रमा शैक्षणिक संकुलचे उपाध्यक्ष हनुमंत पाटोळे ,मा.चेअरमन सुनील नागवडे , उपाध्यक्ष संजय नागवडे, शरद नागवडे संचालक बाभूळसर वि का ,ज्येष्ठ शिवाजी नाना मचाले, हरिभाऊ नागवडे चेअरमन श्रीदत्त पतसंस्था, मा. चेअरमन नानासो नागवडे,श्री दत्त पतसंस्था व्हा.चेअरमन संतोष नागवडे, महेश नागवडे संचालक रुक्मिणी बँक, संचालक रामभाऊ नागवडे, संचालक अमोल नागवडे, शरद नागवडे, मा व्हा चेअरमन/संचालक अल्लाउद्दीन अलवी,महेंद्र रणदिवे, हनुमंत देशवंत,दत्तात्रय नागवडे , सुनील नागवडे ,मारुती नागवडे, महादेव नागवडे, बापू नागवडे, लालासो नागवडे, बाळासाहेब थोरात,दत्तात्रय रणदिवे, संस्थेचे सचिव विजय सोपान नागवडे,सहाय्यक सौरभ नागवडे, मदतनीस जाकीर सय्यद आदी बहुसंख्येने उपस्थित होते .यावेळी बोलताना संस्थेचे सचिव विजय नागवडे यांनी संस्थेचा लेखाजोखा मांडताना संस्थेची स्थापना संस्थापक कै. तुकाराम विठोबा नागवडे यांनी केली असून या संस्थेची उलाढाल मोठ्या प्रमाणात झाली आहे. तसेच संस्थेचे भागभांडवल ३५ लाख १४ हजार ५९५असून संस्थेचे कर्ज वाटप ३ कोटी वर आहे तसेच संस्था बँक पातळीवर शंभर टक्के केली असून संस्थेला चांगल्या प्रकारे समाधानकारक नफा आहे.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष मनोहर मचाले यांनी सभासदांनी वेळेवर कर्ज भरणा केल्यास सभासदांना पुढील काळात चांगल्या प्रकारे डीव्हीडंड वाटला जाईल. तसेच सभासदांची दिवाळी गोड केली जाणार असल्याचे प्रसार माध्यमांशी बोलताना अध्यक्ष मनोहर मचाले यांनी सांगितले आणि सर्व उपस्थितांचे आभार संचालक अल्लाउद्दीन अलवी यांनी मानले.