Home ताज्या बातम्या सत्ताधाऱ्यांकडून जाणीवपूर्वक निधी नाकारला जातोय ; खासदार सुप्रिया सुळे

सत्ताधाऱ्यांकडून जाणीवपूर्वक निधी नाकारला जातोय ; खासदार सुप्रिया सुळे

0
सत्ताधाऱ्यांकडून जाणीवपूर्वक निधी नाकारला जातोय ; खासदार सुप्रिया सुळे

महाविकास आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

पुणे, दि. २५ महाविकास आघाडीच्या वतीने पुणे जिल्हा नियोजन समितीच्या विरोधात लेखी निवेदन देऊन खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले.

पुणे जिल्हा नियोजन समिती कडून विकास कामांना निधी मिळतो परंतु महाविकास आघाडीच्या आमदार, खासदारांनी सुचविलेली कामे जाणीवपूर्वक निधी नाकारल्याचा आरोप महाविकास आघाडी कडून केला आहे त्यामुळे पुणे जिल्हा नियोजन समितीच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयात समोर खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली निषेध व्यक्त करत राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत तीव्र आंदोलन करण्यात आले. तसेच राज्यात आजवर अनेक पक्षांचे सरकार होते सत्ताधारी सरकारकडून विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींना निधी देताना कायम समान न्याय देण्याचे काम केले मात्र पुणे जिल्ह्यातील विरोधी पक्षातील लोक प्रतिनिधींना जिल्हा नियोजन समिती मार्फत कोणत्याही प्रकारचा निधी दिला जात नाही. त्यामुळे सत्ताधारी पक्षाकडून संविधान विरोधी काम सुरू आहे. या सरकारच्या कार्यपद्धतीचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही आंदोलन केले असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले

यावेळी या आंदोलनात आमदार अशोक पवार, आमदार संग्राम थोपटे, आमदार संजय जगताप, जिल्हाध्यक्ष जगन्नाथबापू शेवाळे, प्रशांत जगताप यांच्यासह महाविकास आघाडीचे आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते.