बेशिस्त वहान चालकांमुळे सोमजी चौकात नेहमीच वहातुक कोंडी होते. (छाया: संदिप डोके हडपसर)
हडपसर प्रतिनिधी संदीप डोके
कोंढवा बुद्रुक येथील सोमजी चौकामध्ये रोजच वाहतुक कोंडी होत असल्याने वाहन चालकांसह स्थानिक नागरिक हैराण झाले असून स्थानिक नगरसेवक व संबंधित प्रशासनाने याकडे लक्ष देऊन सदरील चौकात वाहतुक नियंत्रण दिवे बसविण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते अमोल धर्मावत व माजी सरपंच भरतशेठ धर्मावत यांनी केली आहे.
सोमजी चौक वाहतुक कोंडीचा अड्डा बनला असुन या चौकातुन कात्रज मार्गी कोंढवा,हडपसर,सासवड,पुणे शहर अशा विविध भागात जाणारया वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात असते त्यातच जड वाहने सुध्दा याच रस्त्याने जात असल्याने नेहमीच या चौकात वाहतुक कोंडीचा प्रश्न उपस्थित रहातो कोंढवा बुद्रुक गावठाणाकडे जाण्यासाठी उताराचा भाग असल्याने व गावठाणाकडुन सोमजी चौकाकडे येण्यासाठी चढ आहे त्यामुळे या चौकात मोठा अपघात होण्याचा संभव आहे त्यातच शाळेंच्या बसेस देखील मोठ्या प्रमाणात याच चौकातुन जातात त्यामुळे या चौकात वाहतुक नियंत्रण दिवे वाहतुक पोलिस चौकात नेमावा बेशिस्त वहान चालकांमुळे या चौकात अपघाताचे प्रमाण देखील वाढत असल्याने शाळेतुन मुले घरी येईपर्यंत पालकांच्या मनात भितीचे वातावरण असते तरी स्थानिक नगरसेवक व संबंधित प्रशासनाने याकडे लवकरात लवकरात लवकर लक्ष घालुन वाहतुक कोंडीचा प्रश्न मार्गी लावावा अन्यथा नागरीकांच्या जिवासाठी रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा माजी सरपंच भरतशेठ धर्मावत यांनी दिला आहे
सोमजी चौक हा वहातुक कोंडीचा केंद्रबिंदु बनला असुन स्थानिक प्रतिनिधी व संबंधित प्रशासन एखाद्या मोठ्या अपघाताची वाट पहात आहे शाळेतुन मुले घरी येत नाही तोपर्यंत पालकांच्या मनात धाकधुकि असते तरी लवकरात लवकर प्रशासनाने वहातुक कोंडीचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी केल्याचे जनसेवक राजेंद्र भिंताडे तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते हेमंत बधे यांनी “शिरूर हवेली न्यूज” शी बोलताना सांगितले.