निमगाव म्हाळुंगी येथील दशक्रिया विधी शेड बांधकामाचे मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन

निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) भाजपा किसान मोर्चा प्रदेश सचिव जयेश शिंदे यांच्या प्रयत्नातून मिळालेल्या निमगाव म्हाळुंगी येथील दशक्रिया शेडच्या बांधकामाचे भूमिपूजन मा. श्री. प्रदीपदादा कंद मा. जि. प.अध्यक्ष पुणे तथा विद्यमान संचालक पी डी सी सी बँक तसेच पंचायत समिती सदस्य विजयदादा रणसिंग, आबासाहेब सोनावणे अध्यक्ष भाजपा शिरूर तालुका यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव जयेशदादा शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

यावेळी भाजपा युवा मोर्चा प्रदेश सदस्य नवनाथ भुजबळ, भाजपा किसान मोर्चा शिरूर तालुका अध्यक्ष अनिल नवले,निमगाव म्हाळुंगी चे विद्यमान सरपंच बापूसाहेब काळे, उपसरपंच ज्योतीताई चव्हाण, ग्रामविकास अधिकारी गुलाबराव नवले, माजी उपसरपंच कविता चौधरी, भरत विधाटे,ग्रामपंचायत सदस्य प्रदीप पवार, डॉ.सचिन चव्हाण,भारतीय जनता पार्टीच्या पुणे जिल्हा संपर्कप्रमुख विजय मारुती विधाटे व माऊलीशेठ विधाटे शिवसेना शाखाप्रमुख दशरथ नागवडे बंडू कारकुड,सोमनाथ लांडगे, नितीन गायकवाड व ग्रामस्थ उपस्थित होते. सदर कार्यक्रम प्रास्ताविक पंचायत समिती सदस्य विजयदादा रणसिंग यांनी केले तर सूत्रसंचालन निमगाव म्हाळुंगीचे माजी सरपंच रावसाहेब चव्हाण यांनी केले, आणि सर्व मान्यवरांचे आभार निमगाव म्हाळुंगीचे सरपंच बापूसाहेब काळे यांनी केले

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें