अल्लाउद्दीन अलवी
शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा, बाभुळसर बु.,गणेगाव दुमाला ,तांदळी, इनामगाव ,पिंपळसूट्टी शिरसगाव काटा,सादलगाव, वडगाव रासाई आदी पंचक्रोशीतील गणेश भक्तांनी अतिशय जड अंतकरणाने आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देताना अगदी काही जणांना अश्रू आनावर झाले.तसेच अतिशय शांततामय मिरवणुकीचे नियोजन शिरूर पोलीस स्टेशनचे निरीक्षक माननीय केंजळे साहेब यांच्या मार्गदर्शनाने सर्व मंडळांनी शिस्तबद्ध कुठल्याही प्रकारचा गोंधळ न करता अतिशय शांततामय मिरवणूक पार पाडली. बाभुळसर बु येथे सरपंच दिपाली नागवडे व महेंद्र नागवडे यांच्या हस्ते सत्यनारायण महापूजा तसेच महाआरती घेऊन सर्व गणेश भक्तांनी या भव्य दिव्य मिरवणुकीने गणरायाला निरोप दिला. यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी गणेश विसर्जनाच्या निमित्ताने बाभुळसर बु गावचे रावसाहेब अमृत नागवडे यांचे जावई शरद पवार यांचे चिरंजीव अजित शरद पवार याला स्वेदान डेन्मार्क (अमेरिका खंड) येथे होणाऱ्या बॅंडी आईस स्केटिंग या मैदानी खेळासाठी होणाऱ्या १६ वर्षे खालील जागतिक पातळीवर होणाऱ्या मिनी वर्ल्ड कप २०२४ साठी भारतीय संघ दिल्ली येथे निवड चाचणीमध्ये भारतीय संघामध्ये स्थान मिळून आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी प्राप्त झाली, त्याबद्दल बाभुळसर बु गावच्या वतीने सरपंच दिपाली नागवडे यांच्या हस्ते कु. अजित पवार याचा श्रीफळ शाल देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.