Home ताज्या बातम्या नारायणगाव मध्ये शिक्षक पाल्य गुणगौरव सोहळा संपन्न

नारायणगाव मध्ये शिक्षक पाल्य गुणगौरव सोहळा संपन्न

0
नारायणगाव मध्ये शिक्षक पाल्य गुणगौरव सोहळा संपन्न

 स्पर्धात्मक युगामध्ये ध्येयप्राप्तीसाठी श्रमाला विशेष महत्त्व;चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन

नारायणगाव (ता.जुन्नर) येथे स्पर्धात्मक युगामध्ये ध्येयप्राप्तीसाठी श्रमाला विशेष महत्त्व असल्याचे प्रतिपादन सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे चेअरमन चंद्रकांत पाटील यांनी शिक्षक पाल्य गुणगौरव सोहळ्यात बोलताना केले

यावेळी सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडचे सचिव किशोर पाटील,सहसचिव सतिश माने,खजिनदार सतेश शिंदे,तज्ज्ञ संचालक गुलाबराव गवळे,शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष व पालक संचालक प्राचार्य तुकाराम बेनके, संचालक पांडुरंग कणसे, गोविंदराव सुळ, जगन्नाथ जाधव, मा.संचालक दशरथ काशिद, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे ग्रामीणचे अध्यक्ष निलेश काशीद, उपाध्यक्ष प्रा.जितेंद्रकुमार थिटे,राष्ट्रवादी शिक्षक सेलचे अध्यक्ष संतोष ढोबळे, जुन्नर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष ताबाजी वाघदरे,सचिव अशोक काकडे,संजय कुटे,संजय वाघ, प्रकाश कंठाळे, गणेश चौधरी, काळे सर, नारायणगाव शाखेचे मॅनेजर शांताराम माधळकर,अक्षय डोंगरे, सुषमा मोरे उपस्थित होते.

दहावीनंतर शैक्षणिक स्पर्धेला सुरुवात होते विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांमधील बारकावे लक्षात घेऊन काही कौशल्य आत्मसात करणे गरजेचे आहे, भविष्यामध्ये सभासदांच्या हितासाठी ऑनलाइन ॲप विकसित करण्याचा संस्थेचा मानस असून पर्यटनाच्या योजना तसेच मोठ्या हॉस्पिटलशी टायअप करून सभासदांना अधिक सुखकर सेवा देण्याची इच्छा देखील पाटील यांनी बोलून दाखवली.तसेच शिक्षक पाल्याच्या ह्या शैक्षणिक प्रवासाला पाटील यांनी सेकंडरी परिवाराकडून शुभेच्छा दिल्या,लोणावळ्याप्रमाणे महाबळेश्वरला देखील सभासदांना निवासी सेवा लवकरच उपलब्ध होत असल्याचे सचिव किशोर यांनी सांगितले.सावित्री लखपती,फातिमा समृद्धी तसेच कर्मवीर विशेष ठेव योजनेचा सभासदांनी जास्तीत जास्त फायदा घेण्याचे आवाहन संस्थेच्यावतीने यावेळी करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलासराव करपे यांनी तर आभार पांडुरंग कणसे यांनी मानले.