शिरूर प्रतिनिधी एकनाथ थोरात
शिरूर तालुक्यातील पूर्व भागामधील निमोने गावातील एका गॅस विक्रेत्याने चक्क १००० रुपये किमतीने घरगुती गॅस सिलिंडरची विक्री करून काळाबाजार केल्याचा प्रकार ऑनलाईन पेमेंट केल्यामुळे उघडकीस आला आहे.
शनिवार दिनांक १४ रोजी सायंकाळी निमोने येथे एका शॉप वर कुठलेही गॅसचे एजन्सी चे नियम न बाळगता एका संबंधित बहुजन व्यक्तीला सुरुवातीला पुस्तकाची मागणी करत त्याचा फायदा घेत वाढीव रकमेची मागणी करत आणि जास्त वेळ थांबून ठेऊन गॅस विक्री करण्याचा प्रकार घडला आहे सबंधित व्यक्तीकडे ऑनलाईन पेमेंट असल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला आहे.
घरगुती गॅस ही एक जीवनावश्यक वस्तू असताना गॅस एजन्सी धारक आणि विक्रेता शासनाच्या किमतीच्या दरात गॅस न देता आणि कागदपत्राची पूर्तता विलंब करून वाढीव दराने गॅस विक्री करून सर्वसामान्य जनतेची फसवणूक करत असतात तसेच या परिसरात मोठ्या प्रमाणात मागील काळात असे प्रकार घडले आहेत असे नागरिकांमध्ये दबक्या आवाजात चर्चा चालू आहे या सर्व गोष्टींना आळा कोण बसवणार आणि कधी यावर सर्वसामान्य नागरिकांना प्रश्न उपस्थित झाला आहे… या सर्व बाबींचा विचार करून योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी सबंधित व्यक्तीकडून केली जात आहे.
सध्या आठशे पन्नास रुपये या सरकारी दराप्रमाणे मिळणारे घरगुती सिलेंडर १ हजार रुपयांना विकले जात आहेत.घरगुती सिलिंडर घेण्याकरिता गॅस कंपन्यांनी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामुळे ऑनलाईन बुकिंग केल्याशिवाय ग्राहकांना एजन्सीकडून सिलिंडर दिला जात नाही. तशा स्पष्ट सूचना देखील एजन्सीच्या बाहेर लावलेल्या आहेत. मात्र या सूचना फक्त घरगुती गॅस धारकांसाठीच असल्याचे चित्र सध्या परिसरातील दुकानांमध्ये पाहायला मिळत आहे.
काळ्या बाजारात विकल्या जात असलेल्या या गॅस सिलेंडर मुळे गॅस वितरण एंजन्सीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपास्थित करण्यात येत आहे. तसेच परिसरातील हॉटेल, चायनीज सेंटर, स्वीट होमच्या दुकानात देखील घरगुती गॅस सिलिंडरचा वापर केला जात असल्याचा प्रकार घडत आहे. घरगुती गॅस सिलेंडरची खुलेआम काळ्या बाजाराने विकी होत आहे मात्र पुरवठा विभाग आणि गॅस कंपन्यांकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
वाढीव दराने हा विक्रेता गॅस विकत आहे हे मलाही माहीत नव्हते, तसेच ग्राहकांशी बोलण्याची प्रवृत्ती समजल्यास आम्ही त्वरीत त्याची चौकशी करून गॅस एजन्सी पॉइंड बंद केला आणि सर्व एजन्सी पोईंडला तातडीने सूचना देऊन असे कृत्य आढळून आल्यास कारवाई करू:-भानुदास ढवळे, शंभूराजे भारत गॅस एजन्सी, वडगाव रासाई