तुळापुरच्या सोनाली शिवले यांना ”आदर्श शिक्षिका” पुरस्कार प्रदान

श्री क्षेत्र तुळापुर येथील रहिवासी असलेल्या तथा वडगाव शेरी येथील पुणे मनपा शाळा क्र.९९ जी मधील उपशिक्षिका सोनाली सोमनाथ शिवले यांना पुणे महानगर पालिकेच्या वतीने पुणे यशदा चे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड यांच्या हस्ते मानपत्र, सन्मानचिन्ह व टॅब देऊन “आदर्श शिक्षिका पुरस्कार २०२४” प्रदान करून सन्मानित करण्यात आले.यामुळे हवेली तालुक्यातील श्री क्षेत्र तुळापुर गावच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

शिक्षक दिनानिमित्त गुरुवार दि.५ सप्टेंबर रोजी पुणे महानगर पालिकेचा आदर्श शिक्षक पुरस्कार २०२४ हा कार्यक्रम पुणे,बालगंधर्व रंगमंदिर येथे पुणे यशदा चे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड यांचे शुभहस्ते व पुणे मनपाचे प्रशासक तथा आयुक्त डॉ.राजेंद्र भोसले यांचे अध्यक्षतेखाली तसेच पुणे शिक्षण विभाग मनपाचे उपयुक्त आशा राऊत,शिक्षण प्रमुख सुनंदा वाखारे यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

उपशिक्षका शिवले यांना पुरस्कार मिळाल्यानंतर पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती रवींद्र कंद,श्री क्षेत्र तुळापूरचे माजी सरपंच पवन खैरे,गणेश पुजारी,राजाराम शिवले,सहाय्यक शिक्षण प्रमुख एम. आर. जाधव व विजय आवारी,पुणे जिल्हा आदर्श विषयतज्ज्ञ सोमनाथ शिवले,आदर्श शिक्षक दत्तात्रय गायकवाड,डॉ. अस्मिता बहिरट,प्रा. किशोर फडतरे यांनी अभिनंदन केले.

शिक्षण क्षेत्रातील आदर्श कार्याची घेतली दाखल

सोनाली शिवले यांनी या अगोदर गणिती खेळ ” खेळू आनंदे ” ह्या नवोपक्रमाचे राज्यस्तरावर सादरीकरण, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० – व्हिडीओ निर्मिती स्पर्धेमध्ये पुणे जिल्हा व महानगरपालिका क्षेत्रात प्रथम क्रमांक, शिष्यवृत्ती ५ वी परीक्षेमध्ये ३ विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत व २१ विद्यार्थी उत्तीर्ण,जाणीव सामाजिक संस्था यांच्यातर्फे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०१८ ने सन्मानित,नवी दिशा, नवे उपक्रम समूह यांच्यातर्फे राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार २०२४ ने सन्मानित केले आहे.तसेच शाळा पातळीवर विद्यार्थी गुणवत्तेचे वैविध्यपूर्ण उपक्रमाची अंमलबजावणी व आधुनिक तंत्रज्ञानाचा अध्यापनात प्रभावी वापर केलेला आहे. या सर्व कार्याची दखल घेऊन व निवड समितीच्या निकषानुसार हा आदर्श शिक्षक पुरस्कार पुणे महानगर पालिका यांनी सोनाली शिवले यांना प्रदान केला आहे.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें