पिंपरी पेंढार ता. जुन्नर : येथे दि.६/९/२३ रोजी संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हा यांच्या वतीने जुन्नर तालुका पदाधिकारी कार्यकारणीची निवड पुणे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. त्यामध्ये स्वप्नील वामन, (कार्याध्यक्ष), मनोहर गाजरे (उपाध्यक्ष),आशिष गाजरे (सचिव), रामदास घाडगे, (कोषाध्यक्ष) दिपक माळी (संघटना) यांना पदाधिकारी निवडीचे पत्र देऊन त्यांना नवीन जबाबदारी देण्यात आली.
या कार्यक्रमप्रसंगी संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे, यांच्या सह जुन्नर तालुक्यातील आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने आढावा बैठकीस उपस्थित होते.
आढावा बैठकीमध्ये संभाजी ब्रिगेड संघटन वाढी संदर्भात, जुन्नर भागात पाऊस कमी झाल्याने तेथील शेतकरी हवालदिल झाला आहे शेतकऱ्यांच्या समस्या व प्रश्नांवर, जिल्हा प्रशासनाने जुन्नर तालुक्यात जणावरांसाठी चारा डेपो मोठ्या संख्येने सुरू करणे, शेतकऱ्यांना सरकारी मदत मिळवून देण्यासंदर्भात अश्या अनेक विविध विषयांवर चर्चा करण्यात आली,
जालना येथे झालेल्या मराठा आरक्षणावर करणाऱ्या आंदोलकांवर झालेल्या लाठी चार्जचा संभाजी ब्रिगेड च्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला तसेच संभाजी ब्रिगेड मध्ये वर्षोनुवर्षे काम करणाऱ्या संभाजी ब्रिगेड च्या कार्यकर्त्यांची जुन्नर तालुका कार्यकारणी मध्ये पदाधिकारी म्हणून निवड करून त्यांना नवीन जबाबदारी देण्यात आल्याचे तसेच पुर्व तालुकाध्यक्ष राजाराम गाजरे, व पश्चिम तालुकाध्यक्ष संजय वऱ्हाडी यांनी जुन्नर तालुक्याचा आढावा दिला, राजाराम गाजरे यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांना भेडसावणारा प्रश्न बैठकीत मांडला, पुणे जिल्हा सचिव निलेश ढगे,शिरूर लोकसभा अध्यक्ष संदीप मुंगसे, कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष नवनाथ जाधव, जिल्हा उपाध्यक्ष निलेश कांबळे, महेंद्र दाते,तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब गाजरे, उपाध्यक्ष राजेंद्र गाजरे , उपस्थित होते तर प्रवक्ते प्रवीण सोनवणे यांनी आभार मानले असे पुणे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे यांनी “शिरूर हवेली न्यूज” शी बोलताना सांगितले.