मांडवगण फराटा (प्रतिनिधी) अल्लाउद्दीन अलवी
ता १२ श्री वाघेश्वर विद्याधाम माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय मांडवगण फराटा ता शिरूर जि पुणे येथे प्राध्यापक वसंत हंकारेसर यांचे “न समजलेला बाप “या विषयांवर व्याख्यान १९९९ एसएससी बॅच यांनी आयोजित केले .
यावेळी घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक दादा पाटील फराटे , शिरूर पंचायत समिती सदस्य राजेंद्र गदादे, माजी पंचायत समिती सदस्य लक्ष्मण फराटे ,मा.चेअरमन मदन फराटे,सरपंच समीक्षा फराटे, माजी घोडगंगा संचालक लतिकाताई जगताप आदी बहुसंख्येने उपसरपंच सदस्य व सर्व पंचक्रोशीतील विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे पदाधिकारी कर्मचारीवर्ग ,तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सचिव सर्व सदस्य पालक बंधू आणि भगिनी आणि प्रशालेच्या तमाम नवीन पिढी जे प्रा. वसंत हंकारेसर यांच्या विचारांचे बोध घेणारे विद्यार्थी,विद्यार्थीनी ,शिक्षक वृंद बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी अतिशय सुंदर व्याख्यानामध्ये बोलताना प्राध्यापक वसंत हंकारे सर यांनी सांगितले की संभाजी राजांना छत्रपती शिवाजी महाराजांनी जी बाप म्हणून शिकवण दिली ती या मुलांच्या मनावर नक्कीच बापाविषयी प्रेम तयार होईल अशी यावेळी अपेक्षा व्यक्त केली.
तसेच बाप आणि मुलीचं नातं काय असतं ते सर्व पालकांना आणि मुलांना, मुलींना एकत्र घेऊन कडकडून मिठी मारताना यावेळी जाणवलं की खरोखरच बाप काय चीज आहे हे हंकारेसर यांनी यावेळी दाखवून दिले .तसेच सर्वांच्या डोळ्यातील अश्रू वाहत राहिले आणि खरोखरच पुढील पिढीने आई-वडिलांच्या माना झुकतील अशी कृत्य करू नये असे आव्हान करण्यात आले.