लोणीकंद मध्ये संविधान स्तंभ कोनशीला उभारणीसाठी भूमीपूजन 

लोणीकंद (ता. हवेली) ग्रामपंचायत निधीच्या माध्यमातून सिद्धार्थ नगरमध्ये संविधानाच्या प्रास्ताविकेचा संविधान स्तंभ कोनशीला उभारण्यात येणार आहे त्याचे भूमीपूजन सरपंच मोनिका कंद तसेच उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. १२ फूट उंचीची कोनशीला उभारण्यात येणार असून त्यासाठी अंदाजे १५ लाख रुपये खर्च येणार असल्याची माहिती ग्रा. सदस्य आशिष तुकाराम गायकवाड यांनी माध्यमांना दिली

यावेळी माजी सरपंच सागर गायकवाड, श्रीकांत कंद, उपसरपंच, ग्रा. सदस्य ग्रामविकास अधिकारी, आजी माजी पदाधिकारी, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत.भारताचे संविधान हा भारताचा सर्वोच्च कायदा आहे. हा दस्तऐवज मूलभूत राजकीय संहिता, संरचना, कार्यपद्धती, अधिकार आणि सरकारी संस्थांची कर्तव्ये आणि मूलभूत अधिकार, मार्गदर्शक तत्त्वे आणि नागरिकांची कर्तव्ये निर्धारित करणारी चौकट मांडतो. हे जगातील सर्वात मोठे लिखित राष्ट्रीय संविधान आहे.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें