शिरूर, क्रीडा व युवक सेवा संचानालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे आणि शिरुर शिक्षण प्रसारक मंडळाचे, चांदमल ताराचंद बोरा कनिष्ठ महाविद्यालय, शिरूर यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागामध्ये दिनांक ११ व १२ सप्टेंबर २०२४ रोजी आंतर- शालेय मैदानी स्पर्धा (मुले व मुली ) आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेमध्ये धावणे, गोळाफेक, थाळी फेक, भालाफेक, हातोडा फेक, लांब उडी, उंचउडी, तिहेरीउडी, १४,१७,१९ वयोगट मुले व मुली अश्या खेळांचा अंतर्भाव असून अंदाजे २००० विद्यार्थी सहभागी होत आहे. सदर कार्यक्रमाचा उदघाटन समारंभ दिनांक ११ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता जिमखाना विभागाच्या मुख्य मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. सी. मोहिते यांनी दिली.