श्रीगोंदा येथे अल्पदरात आरोग्य तपासणी  

श्रीगोंदा येथे मंगळवार दि.१० सप्टेंबर २४ रोजी, आनंदऋषीजी नेत्रालय, व्हिजन सेंटर, व सनशाईन ऑप्टिकल्स, एस टी डेप्पो मागे खेंडके हॉस्पिटल रोड, वैभव हॉटेलच्या पाठीमागे सर्वरोग निधान तपासणी शिबीर, व संपूर्ण डोळे तपासणी शिबीर, नागरीकांसाठी अल्पदरात सकाळी ९, ते दुपारी २ वाजेपर्यंत हे शिबीर घेण्यात येणार आहे, तरी या शिबिराचा लाभ, सर्व नागरिकांनी घ्यावा असे आवाहन डॉ स्वप्नील होले यांनी केले आहे.

या शिबिरात नागरीकांचे मोफत शुगर तपासणी, मोफत रक्तदाब तपासणी, मोफत इ. सि. जी. तपासणी, पडदा शस्त्रक्रिया, मोतीबिंदू शस्रक्रिया, अल्पदरात शिबीरामध्ये केल्या जातील, या शिबिरात, संपूर्ण नेत्र तपासणी, मशीन द्वारे करून, अल्प दरात, नंबरचे चष्मे दिले जातात, व रुग्णांना गुरुवारी, १२ सप्टेंबर रोजी, आनंदऋषीजी नेत्रालय, अहिल्यानगर, (अहमदनगर) येथे शस्त्रक्रियेसाठी, घेऊन जाण्यात येणार आहे. शिबिराला येताना आधार कार्ड, रेशन कार्ड, मोबाईल नंबर, व चालू गोळ्या, ओषधे, घेऊन येणे आवश्यक आहे.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें