दिवंगत मा. खासदार गिरीश बापट यांच्या जयंती निमित्त आधार कार्ड शिबीराचे आयोजन

पुणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री दिवंगत मा. खासदार गिरीश बापट यांच्या जयंतीनिमित्त सेवा सप्ताहाचे आयोजन शिरूर तालुक्यातील केंदूर येथे आधार कार्ड शिबीर घेऊन करण्यात आले होते.

केंदूर व आजूबाजूच्या परिसरातील गावामधील अनेक नागरिक तांत्रिक व वयक्तिक अडचणीमुळे आधारकार्ड पासून वंचित राहिले होते त्यामुळे शासकीय योजनांपासून हे नागरिक वंचित राहत होते शासकीय कामात अडथळे येत होते या नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर या आधारकार्ड कॅम्पमधे सहभाग नोंदविला या शिबिरात ज्या नागरिकांना नवीन आधारकार्ड काढायचे असेल किंवा आधारकार्ड दुरुस्ती करायची असेल अशा नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेताला. या शिबीरास शिरूर पंचायत समितीच्या उपसभापती सविता पऱ्हाड,सरपंच अमोल थिटे,सुरेश गावडे, सूर्यकांत थिटे,गोविंदराव साकोरे,शिवाजी डेरे, हे उपस्थित होते

या शिबीराचे आयोजन पुणे जिल्हा भाजपा यूवा मोर्चाचे सरचिटणीस अमित सोनवणे, किसान मोर्चाचे कोषाध्यक्ष गणेश साकोरे, तसेच शिरुर-आंबेगाव किसान मोर्चाचे अध्यक्ष बाळासाहेब साकोरे यांनी व सहकार्यांनी केले होते.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें