बाभुळसर बू मध्ये क्रांतीवीर उमाजी राजे नाईक यांची जयंती साजरी

बाभुळसर बू (ता. शिरूर) येथील ग्रामस्थांनी उमाजी राजे नाईक यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली त्यानिमित्त तरुणांनी किल्ले पुरंदर येथून ज्योत प्रज्वलीत करून गावात आणली व संध्याकाळी भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली

उमाजी राजे नाईक यांचा जन्म रामोशी-बेरड समाजात लक्ष्मीबाई व दादोजी नाईक खोमणे यांच्या पोटी ७ सप्टेंबर १७९१ रोजी पुणे जिल्ह्यातील किल्ले पुरंदर येथे झाला. १५ डिसेंबर १८३१ रोजी भोर तालुक्यातील उतरोली या गावी रात्री बेसावध असताना उमाजी राजेंना इंग्रजांनी पकडले. पुण्यात मामलेदार कचेरीतील एका काळ्या खोलीत त्यांना ३५ दिवस ठेवण्यात आले. अशा या खोलीत उमाजीराजे असताना त्यांना पकडणारा इंग्रज अधिकारी कॅप्टन मॅकिन्टॉश दररोज महिनाभर त्यांची माहिती घेत होता. त्यानेच उमाजी राजेंची सर्व हकीकत लिहून ठेवली आहे. उमाजी राजेंवर देशद्रोहाचा खटला चालवण्यात आला आणि या नरवीर राजे उमाजी यांना न्यायाधीश जेम्स टेलर यांनी दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली. देशासाठी फाशीवर जाणारा पहिले नरवीर उमाजी राजे नाईक ३ फेब्रुवारी १८३२ला पुण्याच्या खडकमाळ आळी येथील मामलेदार कचेरीत वयाच्या ४३ व्या वर्षी हसत हसत फासावर चढले.

किल्ले पुरंदर येथून आणलेल्या ज्योतीचे तसेच प्रतिमेचे पूजन सरपंच दिपाली नागवडे यांनी केले, राजे उमाजी नाईक हे भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध लढणारे महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक आणि भारतीय स्वातंत्र लढ्यातील महाराष्ट्रातील निधड्या छातीचे प्रथम सशत्र क्रांतीकारक होते असे यावेळी बोलताना सरपंच दिपाली नागवडे यांनी सांगितले.

या कार्यक्रमास मा. सरपंच गणेश मचाले, कृष्णाजी नागवडे, महेंद्र नागवडे, महेंद्र रणदिवे, शरद बाबुराव नागवडे, संतोष नागवडे, नितीन ढमढेरे, सतीश नागवडे, सुभाष गवळी, किरण राऊत, गणेश खोमणे, किरण कांबळे, अलुद्दीन अल्वी, दत्ता भंडलकर, महेंद्र शिरोळे, गणेश भंडलवर, किरण कांबळे, संतोष चव्हाण, सुदर्शन माकर, गोविंद आडके, जयेश फासगे, विकास राऊत, कांतिलाल जाधव आदी ग्रामस्थ उपस्थित होते,सर्वांचे आभार महेंद्र रणदिवे यांनी मानले.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें