ता.६;शिरसवडी (ता. हवेली) शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या घराच्या नोंदी साठी पैशांची मागणी करणाऱ्या, व वरिष्ठ अधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवणाऱ्या, मनमानी कारभार करणाऱ्या हुकूमशाही पद्धतीने अधिकाराचा वापर करणाऱ्या, शिरसवडी ता. हवेली जि. पुणे येथील ग्रामसेविका स्वाती अशोक राजगुरू यांच्यावर निलंबणाची त्वरित कारवाई करण्यात यावी अशी मागणी पुणे जिल्हा संभाजी ब्रिगेड संघटनेच्या वतीने पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे यावेळी जिल्हा सचिव निलेश ढगे, जिल्हा उपाध्यक्ष रणजित बिराजदार, हवेली तालुकाध्यक्ष शिवाजी पवार, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा मोहिनी रणदिवे, उपस्थित होते.
शिरसवडी येथील रहिवाशी पांडुरंग बाळासाहेब शिंदे यांच्या घराची नोंद करण्यास ग्रामसेविका श्रीमती स्वाती राजगुरू टाळाटाळ करत आहेत, पांडुरंग शिंदे त्यांनी हवेली तालुक्याचे गटविकास अधिकारी भुषण जोशी यांच्याकडे ग्रामसेविका यांची तक्रार केली, गटविकास अधिकारी यांनी ग्रामसेविका यांना घराची नोंद करण्याआठी आदेशाचे पत्र दिले होते त्या पत्राला ग्रामसेविका श्रीमती स्वाती राजगुरू यांनी न जुमानता त्या पत्राला कचऱ्याची टोपी दाखवली,
पांडुरंग शिंदे यांच्या सारखे शेकडो नागरिक ग्रामसेविका यांच्या कामकाजावर वैतागले आहेत, अनेकांच्या घराच्या नोंदी व इतर कामे झालेले नाहीत, अशा नागरिकांनी संभाजी ब्रिगेड संघटनेकडे ग्रामसेविका श्रीमती स्वाती राजगुरू यांची तक्रार करून, न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे, या प्रकरणाची दखल संभाजी ब्रिगेड संघटनेने घेऊन त्वरीत पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांना लेखी निवेदन देण्यात आले
सदरील प्रकरणाची चौकशी करून वरिष्ठ अधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवणाऱ्या, मनमानी कारभार करणाऱ्या हुकूमशाही पद्धतीने अधिकाराचा वापर करणाऱ्या ग्रामसेविका स्वाती अशोक राजगुरू यांच्यावर निलंबणाची त्वरित कारवाई करण्यात यावी कारवाई न झाल्यास संभाजी ब्रिगेड पुणे जिल्ह्याच्या वतीने दिनांक १८ सप्टेंबर वार गुरुवार रोजी सकाळी ११. ३० वाजल्या पासून आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचा असा इशारा संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे यांनी दिला.
सदरिल घराची नोंद लावण्यासाठी अर्जदाराकडून आलेली कागदपत्र चुकीचे असल्यामुळे कागदपत्रांमध्ये तफावत आढळली व त्या कारणामुळे बॉडीमध्ये नोंद न लावण्याचा निर्णय मासिक सभेत घेण्यात आला, त्यामुळे मी गटविकास अधिकारी यांच्या आदेशाचा कोणत्याही प्रकारे अवमान केलेला नाही तसेच मी घराची नोंद करण्यासाठी कुठल्याही प्रकारे पैशाची मागणी केलेली नाही :- स्वाती राजगुरू ग्रामविकास अधिकारी शिरसवडी