वाजेवाडी,(ता शिरूर) : येथील सामाजिक कार्यात कार्यरत असणारे मंडाजी विठ्ठल वाजे यांचे उत्तम समाजिक कार्य, पक्षनिष्ठता, भक्कम पक्ष संघटन, मिळालेल्या पदांवर उत्तम कार्यशैलीने यशस्वी कारण्याचे कौशल्य या सर्व उत्तम बाबींचा विचार करून प्रा. डॉ. प्रशम कोल्हे प्रदेश संयोजक, शिक्षक आघाडी तसेच शिक्षक आघाडी, पुणे शहर संयोजक प्रा. सुनिल विष्णु मोरे यांनी भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र शिक्षक आघाडीच्या वडगाव शेरी मतदार संघ अध्यक्षपदी मंडाजी विठ्ठल वाजे यांची निवड करण्यात आली.
यावेळी भाजपा पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे, युवा मोर्चा सरचिटणीस अमित तान्हाजी सोनवणे संघटन सरचिटणीस राजेशजी पांडे, शिक्षक आघाडी अध्यक्ष अमित एकनाथ सोनवणे, स्वर्गीय खासदार गिरीश बापट यांचे चिरंजीव गौरव बापट यांच्यासह आदी उपस्थित होते, सर्वांनी नवनिर्वाचिन अध्यक्ष मंडाजी वाजे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या
भारतीय जनता पक्षाचे ध्येय धोरणे, आचार-विचार सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहचवून पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी मी सातत्याने प्रयत्नशिल राहणार असल्याचे मंडाजी वाजे माध्यमांशी बोलताना सांगितले .