पुणे, छत्रपती संभाजी महाराज उद्यानात छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यात यावा यासाठी पुणे जिल्ह्यातील संभाजी ब्रिगेडच्या वतीने, पुणे महानगरपालिका कार्यालयावर आंदोलन करण्यात आले
संभाजी ब्रिगेटच्या आंदोलनाची दखल घेत महापालिका आयुक्त भोसले साहेब यांनी तीन महिन्यात छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यात येणार असल्याचे लेखी स्वरूपात आश्वासन दिले, दिलेल्या वेळेत महापालिकेने पुतळा बसवला नाही तर संभाजी ब्रिगेड च्या वतीने छत्रपती संभाजी उद्यानात संभाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात येईल, असा इशारा पुणे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे, शहराध्यक्ष अविनाश मोहिते व उत्तम कामठे, यांनी दिला.
यावेळी कार्याध्यक्ष साजिद सय्यद, सरचिटणीस सिद्धार्थ कोंढाळकर, शहर उपाध्यक्ष जोतिबा नरवडे, जिल्हा सचिव निलेश ढगे, शिरूर लोकसभा अध्यक्ष संदीप मुंगसे, शहर कार्याध्यक्ष अविनाश घोडके, प्रदीप घोडके, अंकुश हाके, संतोष सूर्यवंशी, निलेश कांबळे, अर्चना गव्हाणे,आकाश पवार, संतोष कराळे,रणजित लंगड यांच्यासह संभाजी ब्रिगेडचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.