लोणीकंद (ता. हवेली) येथील मिनाक्षी दिलीप मगर यांनी शेतजमीन गट नंबर १६७ प्लॉटिंगमधील अनधिकृत बांधकामाबाबत वारंवार पीएमआरडीएच्या कार्यालयात हेलपाटे मारूनही अधिकाऱ्यांनी लक्ष न दिल्याच्या निषेधार्थ दि.२ पासून आकुर्डी येथील पीएमआरडीएच्या अतिक्रमण विरोधी पथकाच्या विरोधात उपोषण सुरू केले आहे.
मौजे लोणीकंद, ता. हवेली, येथील जमीन गट नं. १६७ वर पुणे येथील दिवाणी न्यायालयात वाटपाबाबत दावा दाखल केलेला आहे. या मिळकतीमध्ये प्लॉटींग करण्यासाठी रेखांकन किंवा कोणत्याही प्रकारची बांधकाम परवानगी नाही. तरी शेती झोनमध्ये निवासी प्लॉटींग करून जनतेला विक्री करून त्यांची आर्थिक फसवणूक करण्यात येत आहे. मिनाक्षी मगर यांनी महानगर आयुक्त आणि पोलीस आयुक्तांना देखील निवेदन दिले आहे. पुराव्यासह २०२२ पासून कार्यालयाकडे पाठपुरावा सुरू असून वारंवार हेलपाटे मारून देखील दखल घेतली नाही सदर बेकायदेशीर बांधकामे पाडण्याबाबत व विना परवानगी केलेले प्लॉटीग रद्द करण्याबाबत कारवाईकडे दुर्लक्ष केले आहे.
मात्र, कोणतीही कार्यवाही होत नसल्याने मिनाक्षी मगर यांनी पीएमआरडीएच्या विरोधात उपोषण सुरू केले आहे संबंधित विभागातील अधिकाऱ्यांवर कारवाई करून योग्य ती चौकशी करण्याची मागणी तक्रारदार मीनाक्षी मगर यांनी आयुक्तांकडे केली आहे.
हक्काच्या जमिनीवर परस्पर प्लॉटिंग करून बांधकाम व्यावसायिकांनी नातेवाईकांना हाताला धरून अनधिकृत बांधकाम झाली आहेत महावितरणची कोणत्याही प्रकारची मंजुरी न घेता या ठिकाणी चोरून वीज घेत असल्याची तक्रार मीनाक्षी मगर यांनी महावितरणच्या वाघोली शाखेत केली आहे. मात्र, त्याबाबत महावितरण कार्यालयाकडून कोणत्याही प्रकारचे उत्तर मिळाले नाही. याबाबत अधिकाऱ्यांनी या ठिकाणची पाहणी करून योग्य ती कारवाई करावी, असे आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे कारवाई होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण करणार असल्याचे मीनाक्षी मगर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
[ संबंधीत बांधकाम प्रकरणी आम्ही माहिती घेतली आहे. या ठिकाणी काम करणाऱ्यांवर रीतसर नोटिस देणार आहे. त्यांच्यावर कारवाई देखील करण्यात येणार आहे. – दीप्ती सुर्यवंशी-पाटील,उपायुक्त, अतिक्रमण विरोधी व निर्मूलन पथक, पीएमआरडीए]