पुणे नगर महामार्गावर लोणीकंद, वाघोली गावातील नियमित होणारी वाहतूक कोंडीच्या व इतर समस्या सोडविण्यासाठी विद्यमान आमदार अशोक पवार यांनी प्रशासनाला हलवण्यासाठी ‘रन फाॅर वाघोली’चे आयोजन केले. त्यामुळे दि. ३ सप्टेंबर २०२४ रोजी अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील साहेब, पोलीस उपायुक्त (वाहतूक विभाग) अमोल झेंडे व पीएमआरडीए, पीएमसी, पीडब्ल्यूडी, विज वितरक विभागाचे अभियंता अधिकारी बाबर साहेब यांना सोबत घेऊन रस्त्यावरील अडथळ्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडी बाबत खराडी जकात नाका ते लोणीकंद थेऊर फाट्या पर्यंत रस्त्याची पाहाणी करून आढावा घेतला
पुणे-नगर रोडच्या डाव्या आणि उजव्या दोन्ही बाजूंनी पर्यायी मार्गाची देखील प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली, तसेच वाहतूकीत अडथळे ठरणारे वीजेचे खांब हटवून बंच केबल टाकणे, सायंकाळनंतर खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसेस रस्त्यावर कोठेही उभ्या राहिल्याने वाहतूक कोंडी होते, वाहतूक कोंडीला होणारे अडथळे दूर करण्याच्या बाबींवर देखील चर्चा करून तसेच वाघेश्वर मंदिर चौकातील रुंदीकरण, सबवे, आव्हाळवाडी चौक केसनंद चौक यांची प्रत्यक्ष पाहणी करून सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
|
लोणीकंद, वाघोलीतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रशासन ॲक्सेन मोडवर

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)